जाहिरात
Story ProgressBack

IPL 2024 : विजेत्या टीमला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, हरणारी टीमही होणार मालामाल; पाहा बक्षीसाची रक्कम

IPL 2024 Prize Money: आयपीएलचे यंदाचे सीझन अतिशय मनोरंजक ठरले. सर्व संघ उत्तम खेळ खेळले आहेत. पण दमदार प्रदर्शन करून KKR आणि हैदराबाद टीमने अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

Read Time: 2 mins
IPL 2024 : विजेत्या टीमला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, हरणारी टीमही होणार मालामाल; पाहा बक्षीसाची रक्कम

IPL 2024 Prize Money: IPL 2024 सीझनमधील अंतिम सामना (IPL 2024 Final) KKR आणि हैदराबाद टीममध्ये (KKR vs SRH IPL Final)  रंगणार आहे. विजयी संघाला ट्रॉफी आणि बक्षीसाची मोठी रक्कमही मिळणार आहे. इतकेच नव्हे तर पराभूत संघही मालामाल होणार  आहे. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम मैदानामध्ये केकेआर आणि हैदराबाद यांच्यामध्ये सामना होणार आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये हैदराबादने एकदा जेतेपद पटकावलंय तर केकेआर टीम दोनदा विजयी झाली आहे. त्यामुळे यंदा IPL 2024मधील अंतिम सामना कोणता संघ जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या विजयी संघाला किती रोखरक्कम बक्षीस स्वरुपात मिळणार आहेत? हे जाणून घेऊया.

(नक्की वाचा: IPL 2024: आयपीएल फायनलवर वादळाचं सावट, मॅच रद्द झाली तर कुणाला मिळणार ट्रॉफी?)

कोणती टीम होईल मालामाल? (IPL 2024 Champions and Runners Up Prize Money)

BCCIने आयपीएलच्या 17व्या सीझनसाठी 46.5 कोटी रुपये बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे 7 कोटी रुपये आणि 6.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. 

(नक्की वाचा: 5 कारणांमुळे गौतम गंभीर होऊ शकतो टीम इंडियाचा कोच)

पर्पल कॅप व ऑरेंज कॅप विजेत्यांना काय मिळणार बक्षीस? (Purple Cap, Orange Cap Winner Prize Money)

आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये 741 धावांची शानदार खेळी करणारा विराट कोहली (Virat Kohli) ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याला 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळू शकते. तर पंजाब किंग्स टीममधील हर्षल पटेलने 24 विकेट घेतल्याने पर्पल रंगाची कॅप त्याच्याकडेच राहील. पटेलला देखील 15 लाख रुपयांचे मिळेल.

(नक्की वाचा: रिकी पॉन्टिंग खोटं बोलला! जय शहांनी सांगितलं 'त्या' दाव्याचं सत्य)

इमर्जिंग प्लेअर आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर अवॉर्ड (Emerging Player and Most Valuable Player Prize Money)

यंदाच्या सीझनमधील 'इमर्जिंग प्लेअर ऑफ द इअर' पुरस्काराचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूला 20 लाख रुपये तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरला 12 लाख रुपयांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळणार आहे. 

IPL 2024

आयपीएलचा यंदाचा सीझन खूपच मनोरंजक ठरला. सर्व संघांनी शानदार खेळी खेळली. पण KKR आणि हैदराबाद टीमने दमदार प्रदर्शन करत अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. 

T-20 World Cup | Rohit Sharma ची टीम इंडिया वेस्ट इंडिजसाठी रवाना

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Natasha Stankovic : 'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ
IPL 2024 : विजेत्या टीमला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, हरणारी टीमही होणार मालामाल; पाहा बक्षीसाची रक्कम
IPL 2024 Final match KKR vs SRH sunil narine need 18 runs to big  record
Next Article
सुनील नारायण इतिहास रचणार? 18 धावा करताच ही कामगिरी करणारा ठरेल एकमेव खेळाडू
;