जाहिरात
Story ProgressBack

दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर Mumbai Indians 'प्ले ऑफ' कसं गाठणार? पाहा समीकरण

IPL 2024 Mumbai Indians मुंबई इंडियन्सचा या सिझनमधील 'प्ले ऑफ' चा मार्ग खडतर बनला आहे.

Read Time: 2 min
दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर Mumbai Indians 'प्ले ऑफ' कसं गाठणार? पाहा समीकरण
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ गाठण्याची आणखीही संधी आहे. (फोटो सौजन्य AFP)
मुंबई:

IPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals :  पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा या सिझनमधील 'प्ले ऑफ' चा मार्ग खडतर बनला आहे. शनिवारी (27 एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं त्यांचा 10 रननं पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेलं 258 रननं आव्हान मुंबई इंडियन्सला पूर्ण करता आलं नाही. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 247 रन केले. मुंबई इंडियन्सचा या सिझनमधील हा सहावा पराभव आहे.

तिलक वर्माची खेळी व्यर्थ

मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्मा (Tilak Varma) नं आक्रमक अर्धशतक झळकावलं. त्यानं 32 बॉलमध्ये 63 रन काढले.  मुंबईच्या इतर कोणत्याही खेळाडूला पन्नाशी पार करता आली नाही. कॅप्टन हार्दिक पांड्यानं 24 बॉलमध्ये 46 रन काढले. वर्मा-पांड्या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 39 बॉलमध्ये 71 रनची भागिदारी करत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. ही जोडी फुटल्यानंतर अन्य फलंदाज दबावात बाद झाले.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहितनं फक्त 8 रन केले. इशान किशन (20) तर सूर्यकुमार यादव (26) रन काढून आऊट झाले. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या टीम डेव्हिडनं 17 बॉलमध्ये 37 रन केले. दिल्लीकडून मुकेश कुमार आणि रसिक सलाम यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. खलील अहमदला 2 विकेट्स मिळाल्या.

मुंबईचा मार्ग खडतर

मुंबई इंडियन्सचा हा 9 सामन्यातील सहावा पराभव आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात सध्या 6 पॉईंट्स असून ते सध्या नवव्या क्रमांकावर आहेत. आता प्ले ऑफ गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता उर्वरित पाचही सामने महत्त्वाचे आहेत. या सर्व सामन्यात विजय मिळवला तर त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश नक्की असेल.

( नक्की वाचा : माकड चावल्यानं सोडला होता वर्ल्ड कप, आता घालतोय IPL मध्ये धुमाकूळ )

फ्रेजरची फटकेबाजी

त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून  जेक फ्रेझर-मॅकगर्कनं 27 बॉलमध्ये 84 रन्स केले. त्यानं फक्त 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. ट्रिस्टन स्टब्लसनं 25 बॉलमध्ये 48 रन काढले. शाही होप (41), अभिषेक परोल (36) यांनी दिल्लीच्या धावसंख्येला हातभार लावला. कॅप्टन ऋषभ पंतनं 29 रन काढले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination