RCB ला प्ले ऑफ गाठण्यासाठी CSK नाही तर 'हा' आहे अडथळा

IPL 2024 Playoff Scenairo : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) हा शनिवारी होणारा सामना 'प्ले ऑफ' साठी निर्णायक ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
RCB नं सलग पाच सामने जिंकत IPL 2024 मध्ये जोरदार कमबॅक केलंय. (फोटो BCCI/IPL)
मुंबई:

आयपीएल 2024 आता अंतिम टप्प्यात आहे. 21 मे पासून 'प्ले ऑफ' च्या लढती सुरु होतील. दहा पैकी टॉप चार टीम 'प्ले ऑफ' साठी पात्र होतील. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) 'प्ले ऑफ' साठी पात्र झालेली पहिली टीम ठरलीय. तर राजस्थान रॉयल्सचं (RR) प्ले ऑफ मधील स्थान जवळपास निश्चित झालंय.  उर्वरीत दोन जागांसाठी सध्या जोरदार चुरस आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) हा शनिवारी होणारा सामना 'प्ले ऑफ' साठी निर्णायक ठरणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

फाफ ड्यू प्लेसिसच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या आरसीबीनं या सिझनमध्ये जोरदार कमबॅक केलंय. आरसीबीनं पहिल्या आठपैकी फक्त एक सामना जिंकला होता. पहिल्या हाफमध्ये तळाला असलेल्या आरसीबीनं त्यानंतरचे सलग पाच सामने जिंकले आहेत. आता 13 सामन्यांनतर आरसीबीचे 12 पॉईंट्स आहेत. आरसीबीचा साखळी फेरीतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी शनिवारी (18 मे) होईल.

'प्ले ऑफ' चं समीकरण काय?

आरसीबीला 'प्ले ऑफ' गाठण्यासाठी चांगल्या रनरेटसह सीएसकेला पराभूत करणं आवश्यक आहे. 13 सामन्यानंतर आरसीबीचा रनरेट 0.387 इतका आहे. तो सीएसकेच्या 0.528 रनरेटपेक्षा कमी आहे. सीएसकेला रनरेटमध्येही मागं टाकण्यासाठी किमान 18 रननं सीएसकेचा पराभव करावा लागेल. आरसीबीनं दुसऱ्यांदा बॅटिंग केली तर त्यांनी विजयी लक्ष्य 18.1 ओव्हर्समध्ये जिंकावा लागेल. आरसीबीचा सध्याचा फॉर्म पाहाता त्यांची बाजू वरचढ आहे. त्याचबरोबर बंगळुरुमध्ये होम ग्राऊंडवर हा सामना होत असल्याचा अतिरिक्त फायदा देखील विराट कोहली आणि टीमला मिळेल.

( नक्की वाचा : विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही? )
 

सर्वात मोठा अडथळा

आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यावर पावसाचं सावट असून बंगळुरुचं हवामान हा आरसीबीला 'प्ले ऑफ' गाठण्यासाठी मोठा अडथळा ठरु शकतो. शनिवारी पावसाची शक्यता 70 टक्के असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. कर्नाटकच्या हवामान खात्यानंही 17 ते 21 मे दरम्यान बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलाय.

Advertisement

पावसाच्या अडथळ्यामुळे शनिवारचा सामना रद्द झाला तर दोन्ही टीमना 1-1 पॉईंट मिळेल. त्या परिस्थितीमध्ये आरसीबीचे 13 आणि सीएसकेचे 15 पॉईंट्स होतील. टॉप चारमध्ये जाण्याचं आरसीबीचं स्वप्न यामुळे पूर्ण होणार नाही. त्यामुळे आरसीबीला प्ले ऑफ गाठण्यासाठी सीएसके प्रमाणेच पावसाचा देखील अडथळा आहे. सीएसकेचा पराभव करणे हे त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल पण, पाऊस हा अडथळा ठरु नये अशीच प्रार्थना आरसीबीचे फॅन्स करत असतील.  

Advertisement
Topics mentioned in this article