धोनी-जडेजा नाही तर 'ही'  जोडी ठरणार CSK साठी वरदान, मुंबईलाही टाकणार मागं

चेन्नई सुपर किंग्सनं आत्तापर्यंत पाचवेळा आयपीएल विजेपद पटकावलंय. ते या सिझनमध्येही विजेतेपद पटकावणार का? हे 2 खेळाडूंवर प्रामुख्यानं अवलंबून आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई:

चेन्नई सुपर किंग्स म्हंटलं की महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजा ही नावं सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतात. धोनी पहिल्या आयपीएल सिझनपासून सीएसकेचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल इतिहासातील दोन यशस्वी टीममध्ये सीएसकेचा समावेश आहे. सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोघांनीही आत्तापर्यंत पाचवेळा विजेतेपद पटकावलंय.

रविंद्र जडेजा आयपीएल 2012 पासून सीएसकेकडं आहे. तो या टीममध्ये धोनीपेक्षाही महागडा खेळाडू आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या मागील आयपीएल फायनलमध्ये जडेजानं निर्णायक क्षणी मोहित शर्माच्या शेवटच्या 2 बॉलवर 10 रन करत त्यांनी सीएसकेला विजेतेपद मिळवून दिलं होतं. 

2 खेळाडू ठरणार वरदान

चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्सला मागं टाकायचं असेल तर सिझनमध्ये त्यांनी खरेदी केलेले दोन खेळाडू महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामधील पहिला खेळाडू आहे भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा ऑल राऊंडर राचिन रविंद्रभारतामध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये रविंद्रनं 64.22 च्या सरासरीनं 578 रन्स केले होते. यामध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. वर्ल्ड कपमध्ये दिग्गज बॉलर्ससमोर रविंद्रनं आत्मविश्वासानं बॅटिंग करत सर्वांना प्रभावित केलंय.

डेव्हॉन कॉनवे जखमी झाल्यानं रविंद्रचा प्लेईंग 11 मधील समावेश निश्चित आहे. ऋतुराज गायकवाडसोबत रविंद्रनं सीएसकेला दमदार सुरुवात करुन दिली तर त्यांचा विजयाचा पाया तिथंच रचला जाईल.

Advertisement

राचिन रविंद्रपेक्षाही आणखी एका न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरवर सीएसकेची भिस्त आहे. तो ऑल राऊंडर आहे डॅरेल मिचेल. मिचेलला मागील आयपीएल लिलावातील सीएसकेचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला 14 कोटी रुपये मोजून सीएसकेनं खरेदी केलं.

मिचेलनं मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 69 च्या सरासरीनं 552 रन केले होते. सीएसकेनं मिडल ऑर्डरमध्ये अंबाती रायुडूची जागा भरुन काढण्यासाठी मिचेलची निवड केली होती. मिडल ऑर्डरमध्ये कोणत्याही नंबरवर येऊन बॅटिंग करण्याची त्याची क्षमता आहे. त्याचबरोबर त्याच्या बॉलिंगचाही धोनी चांगला वापर करुन घेऊ शकतो.
 

Advertisement
Topics mentioned in this article