IPL 2024 RCB vs KKR: 'गौतम गंभीरला ऑस्कर द्या', गावस्करांनी केली मागणी

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

RCB vs KKR IPL 2024:  व्यंकटेश अय्यरचं अर्धशतक आणि सुनील नारायणच्या आक्रमक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) सात विकेट्सनं पराभव केला. केकेआरचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. आरसीबीनं दिलेल्या 183 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना व्यकंटेश अय्यरनं ( 30 बॉलमध्ये 50 ) तर नारायणनं (22 बॉलमध्ये 47) रन्स काढले. या तुफानी खेळीच्या जोरावर

केकेआरनं 19 बॉल आणि सात विकेट्स राखत विजय मिळवला. या मॅचच्या दरम्यान एक खास प्रसंग घडला. या प्रसंगाची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आहे.  

गंभीर-कोहलीची गळाभेट

या मॅच दरम्यान विराट कोहली आणि केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्याकडं सर्वांचं लक्ष होतं. आयपीएल 2023 मध्ये गंभीर लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. त्यावेळी नवीन उल हक सोबत झालेल्या वादामध्ये गंभीरनं नवीनची बाजू घेतली होती. त्यानंतर गंभीर आणि कोहलीमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही स्टार क्रिकेट फॅन्समधील हा वाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. क्रिकेट फॅन्सच्या तो आजही चांगलाच लक्षात आहे. 

शुक्रवारी (30 मार्च) झालेल्या सामन्यात गौतम गंभीर मैदानात आला आणि त्यानं विराट कोहलीची गळाभेट घेतली. दोन्ही खेळाडूंनी हसून एकमेकांशी चर्चा केली. गंभीर आणि कोहली यांच्या मैत्रीचं हे दृश्य क्रिकेट फॅन्सनी गेल्या काही वर्षांपासून पाहिलं नव्हतं. त्यामुळे गंभीर आणि कोहलीमध्ये जे झालं त्यामुळे फॅन्स चांगलेच आश्चर्यचकित झाले. 

Advertisement

या मॅचच्या काही तास आधी स्टार्स स्पोर्ट्सनं गौतम गंभीरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये मला नेहमी आरसीबीला हरवायचं आहे, असं गंभीरनं सांगितलं होतं. 

Advertisement

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गंभीर आणि कोहलीची गळाभेट चांगलीच लक्षवेधी ठरली. त्यावर बोलताना रवी शास्त्री यांनी 'केकेआरला फेअर प्ले ऑवर्ड मिळाला आहे,' असं म्हंटलं. " त्यावर शास्त्रींसोबत कॉमेंट्री करत असलेल्या सुनील गावस्करांनी फक्त फेअर प्ले नाही तर ऑस्कर पुरस्कारही देण्यात यावा अशी मागणी केली. 
 

Topics mentioned in this article