IPL 2024 : 455 दिवसांनंतर ऋषभ पंतचं पुनरागमन, मैदानात उतरताच म्हणाला...

आयपीएल 2024 (IPL 2024) मधील दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पहिला सामना प्रत्येक क्रिकेट फॅन्ससाठी खास आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Rishabh Pant makes Comeback after 455 days : आयपीएल 2024 (IPL 2024) मधील दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पहिला सामना प्रत्येक क्रिकेट फॅन्ससाठी खास आहे. चंदीगडमधल्या महाराजा यादविंदर सिंह इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (DC vs PBKS) हा सामना होतोय.  या सामन्यात भारताचा धडाकेबाज विकेट किपर ऋषभ पंतनं पुनरागमन केलं आहे.

ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी भयंकर कार अपघात झाला होता. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला होता. त्यानंत मोठे ऑपरेशन आणि रिहॅबच्या नंतर पंत मैदानात परतलाय. आयपीएल स्पर्धेपूर्वी पंत फिट असल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं होतं. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सचं तो नेतृत्त्व करतोय. 'मी सध्या फारसा विचार करत नाहीय, पुनरागमनाचा आनंद घेतोय,' असं पंतनं यावेळी सांगितलं.  मागील आयपीएलमध्ये पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरनं दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व केलं होतं. त्या सिझनमध्ये दिल्लीनं नववा क्रमांक पटकावला होता.

या मॅचमध्ये पंजाबचा कॅप्टन शिखर धवननं टॉस जिंकून दिल्लीला पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण दिलं. त्यावेळी पंतनं सांगितलं, ' आम्हाला पहिल्यांदा बॅटिंग हवी होती. पिच थोडं संथ वाटत आहे. माझ्यासाठी हा खूप इमोशनल प्रसंग आहे. मी फारसा विचार करत नाहीय. सध्या फक्त या क्षणाचा आनंद घेतोय. आम्हाला मागच्या सिझनबद्दल फारशी काळजी नाही. आम्ही या सिझनमध्ये चांगली तयारी केलीय.' 

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सनं या मॅचमध्ये चार नव्या खेळाडूंना संधी दिली. सुमीत कुमार आणि वेस्ट इंडिजच्या शाही होप यांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तर, रिकी भुई आणि दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सनं दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पण केलं. 

ऋषभ पंत या मॅचमध्ये चौथ्या नंबरवर खेळायला आला. त्यानं 13 बॉलमध्ये 2 फोरसह 18 रन केले. त्याला हर्षल पटेलनं आऊट केलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article