वर्ल्ड कप गाजवणारे 3 खेळाडू पहिल्यांदाच करणार IPL मध्ये कमाल!

IPL 2024 : 3 महत्त्वाचे खेळाडू यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार असून त्यांच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आयपीएल 2024 आता काही दिवसांवर येऊन ठेपलंय. या सिझनमध्ये खेळणाऱ्या  सर्व 10 टीमची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. या सिझनसाठी झालेल्या लिलावात वन-डे वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंना खरेदी करण्यात सर्वच फ्रँचायझींनी रस दाखवला. यामधील

3 महत्त्वाचे खेळाडू यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार असून त्यांच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

जेराल्ड कोट्झी

दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कप सेमी फायनलपर्यंत पोहचवण्यात जेराल्ड कोट्झीच्या फास्ट बॉलिंगचा मोठा वाटा होता. कोट्झीनं 8 मॅचमध्ये 6.23 च्या इकोनॉमी रेटनं 20 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर 4 मॅचमध्ये 78 रन करत आपण गरज पडल्यास बॅटिंगही करु शकतो, हे दाखवून दिलंय.

कोट्झीला मुंबई इंडियन्सनं 5 कोटींना खरेदी केलंय. मुंबई इंडियन्सला विदेशी फास्ट बॉलर्सची चांगली परंपरा आहे. लसिथ मलिंगा, ट्रेन्ट बोल्ट यांचा टीमला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा होता. जोफ्रा आर्चरनं गेल्या दोन सिझनमध्ये निराशा केल्यानंतर आता कोट्झीकडून मुंबईच्या फॅन्सना मोठ्या अपेक्षा आहेत. 

अझमतुल्ला ओमरझाई

वन-डे वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानच्या दमदार कामगिरीत अझमतुल्ला ओमरझाईचा मोठा वाटा होता. ओमरझाईनं वर्ल्ड कपमधील 9 मॅचमध्ये 70.6 च्या सरासरीनं 353 रन्स केले. त्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर 7 विकेट्सही घेतल्या होत्या. 

Advertisement

भारतीय पिचवर वर्ल्ड कपमध्ये केलेल्या या कामगिरीचा फायदा ओमरझाईला आयपीएलमध्ये होणार आहे. गुजरात टायटन्सनं त्याला खरेदी केलंय. हार्दिक पांड्याची कमतरता भरुन काढण्याची मोठी जबाबादारी त्याच्यावर आहे. तो ही जबाबदारी कशी पार पाडतो यावरही गुजरातचं या सिझनमधील भवितव्य अवलंबून असणार आहे.

राचिन रविंद्र

भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा खेळाडू राचिन रविंद्रनं वन-डे वर्ल्ड कप चांगलाच गाजवला. रविंद्रनं न्यूझीलंडकडून ओपनिंगला येत 64.22 च्या सरासरीनं 578 रन्स केले होते. यामध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता.

Advertisement

जगातील कोणत्याही बॉलिंग अटॅकसमोर दमदार बॅटिंग करण्याची क्षमता असलेल्या रविंद्रला चेन्नई सुपर किंग्सनं 1 कोटी 80 लाखांना खरेदी केलंय. सीएसकेच्या प्लेईंग 11 मध्ये रविंद्रचा समावेश सुरुवातीला अनिश्चित मानला जात होता. पण, डेव्हॉन कॉनवे जखमी झाल्यानं तो आता सलामीला खेळणार हे नक्की आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाखाली नवा रचिन रविंद्र या सिझनमध्ये पाहायला मिळू शकतो. 

Topics mentioned in this article