जाहिरात
1 day ago
मुंबई:

RCB vs PBKS IPL 2025 Final LIVE scorecard : आयपीएल 2025 मधील फायनल लढत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज  (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) यांच्यात फायनल  सुरु झाली आहे. या मॅचमध्ये पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे

या दोन्ही टीमनं आजवर एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावलेलं नाही. त्यामुळे दोन्ही टीमपैकी कुणाचं स्वप्न यंदा पूर्ण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आयपीएलमधील लीग सामन्यात पंजाब किंग्जनं पहिला तर आरसीबीनं दुसरा क्रमांक पटकावला होता. तर आयपीएल प्ले ऑफमध्ये आरसीबीनं पंजाब किंग्जचा 6 विकेट्सनं पराभव केला. तर या पराभवातून सावरत पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सनं पराभव करत फायनल गाठली.


 

RCB ची 'विराट' स्वप्नपूर्ती, पंजाबवर मोठा विजय

बंगळूरूने अखेर आयपीएलचे आपले पहीले विजेतेपद मिळवले आहेत. त्यांनी पंजावर अवघ्या सहा रन्सने विजय मिळवला. पंजाबला धावांचा पाठलाग करताना 184 धावा केल्या. शंशांक सिंग ने पंजाबला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्याने 30 चेंडूत 61 धावा ठोकल्या. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. 

पंजाबचा संघ अडचणीत, 7 वी विकेट ही पडली

पंजाबचा संघ अडचणीत सापडला आहे. त्यांना लागोपाठ धक्के बसले आहे. त्यांची 7  वी विकेट ही पडली आहे. त्यामुळे बंगळूरू विजयापासून काही पाऊलं दुर आहे.  

पंजाबला लागोपाठा दोन धक्के, स्टॉयनिश ही आऊट

नेहल वढेरानंतर स्टॉयनिशही लगेच आऊट झाला. पहिल्याच चेंडूवर सिक्स मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो आऊट झाला.  पंजाबच्या सहा विकेट गेल्या. 

पंजाबला 5 वा धक्का, नेहल वढेरा ही आऊट

पंजाबचा संघ अडचणीत सापडला आहे.   पंजाबला 5 वा धक्का बसला असून नेहल वढेरा ही आऊट झाला आहे. पंजाबला अजून विजयासाठी 55 धावांची गरज आहे.  

कुणाल पांड्याचा भन्नास स्पेल

कुणाल पांड्याने भन्नास स्पेल टाकला. त्याने आपल्या चार ओव्हर्स मध्ये फक्त 17 धावा देत दोन जणांना आऊट केले. त्याच्या या स्पेलमुळे पंजाबचा संघ सध्या बॅकफूटवर गेला आहे. 

RCB vs PBKS : पंजाबचा संघ अडचणीत, जोश इंंग्लिस ही आऊट, 98 वर 4 बाद

फार्मात असलेला जोश इंग्लिस ही आऊट झाला आहे. त्याने 23 चेंडूत 39 धावा केल्या. त्याला कुणाल पांड्याने बाद केले. 

पंजाबला 10 ओव्हर्समध्ये 110 धावांची गरज

पंजाबला विजयासाठी 10 ओव्हर्समध्ये 110 धावांची गरज आहे. पंजाबच्या तीन विकेट्स गेल्या आहेत. इंग्लिस हा पंजाबच्या फलंदाजीची  एक बाजू लावून आहेत. 

RCB vs PBKS : पंजाबला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर अवघ्या 1 रन्सवर आऊट

पंजाबला मोठा धक्का बसला आहे. मागच्या मॅचचा हिरो श्रेयस अय्यर हा अवघी एक रन्स करून आऊट झाला आहे. त्याला रोमारिओ शेफर्डने आऊट केले. त्यामुळे पंजाबची अवस्था 10 व्या ओव्हरमध्ये 3 आऊट 80 झाली आहे. 

पंजाबला दुसरा धक्का, प्रभसिमरन सिंग ही आऊट

पंजाबला दुसरा धक्का मिळाला असून  प्रभसिमरन सिंग ही बाद झाला आहे. त्याने 22 बॉलमध्ये 26 धावा केल्या. त्याला कुणाल पांड्याने आऊट केले.   

IPL 2025 Final LIVE, RCB vs PBKS : फिल सॉल्टनं घेतला भन्नाट कॅच पंजाबला पहिला धक्का

जोश हेजलवूडनंच आरसीबीला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं प्रियांश आर्याला 24 रन्सवर आऊट केलं. फिल सॉल्टनं बाऊंड्रीजवळ त्याचा भन्नाट कॅच घेतला. 

IPL 2025 Final Live : RCB च्या स्टारनं केली मोठी चूक, प्रभसिमरनला मिळालं जीवदान

आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावण्यासाठी पंजाब किंग्जला 191 रनची गरज आहे. पंजाबनं या रन्सचा पाठलाग सुरु केला आहे. आरसीबीचा प्रमुख खेळाडू रोमारियो शेपर्डनं सुरुवातीलाच मोठी चूक केली. त्यानं प्रभसिमरन सिंहला 9 रन्सवर जीवदान दिलं. जोश हेजलवूडच्या बॉलिंगवर शेपर्डनं त्याचा सोपा कॅच सोडला. 

IPL 2025 Final Live : RCB ची इनिंग संपली, वाचा पहिल्या इनिंगमध्ये किती केले रन्स?

आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात फायनल लढत सध्या सुरु आहे. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना आरसीबीनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 190 रन्स केले. आता पंजाब किंग्जला या सिझनचं विजेतेपद पटकावण्यासाठी 191 रन्सचं टार्गेट आहे. आरसीबीकडून एकाही बॅटरला हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही. विराट कोहलीनं सर्वाधिक 83 रन्स केले. 

IPL 2025 Final Live : जितेश शर्माची जोरदार फटकेबाजी RCB नं एकाच ओव्हरमध्ये काढले 23 रन्स

या आयपीएल सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या जितेश शर्मानं 17 व्या ओव्हरमध्ये जोरदार फटकेबाजी केले. त्यानं जेमीसनला दोन उत्तुंग सिक्सर्स खेचले. त्यापाठोपाठ लिव्हिंगस्टोननं एक सिक्स लगावला. या दोघांनी जेमीसनच्या एकाच ओव्हरमध्ये 23 रन काढले. 

IPL 2025 Final Live : RCB ला मोठा धक्का, विराट कोहली हाफ सेंच्युरीपूर्वीच आऊट

आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावण्यात विराट कोहलीला अपयश आलं. तो 43 रन्स काढून आऊट झाला. अझमतउल्लाह ओमरझाईनं विराटला आऊट केलं. विराट आऊट झाल्यानंतर आरसीबीची अवस्था 15 व्या ओव्हरमध्ये 4 आऊट 131 झाला आहे. 

IPL 2025 Final Live : RCB ला मोठा धक्का, विराट कोहली हाफ सेंच्युरीपूर्वीच आऊट झाला.

आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावण्यात विराट कोहलीला अपयश आलं. तो 43 रन्स काढून आऊट झाला. अझमतउल्लाह ओमरझाईनं विराटला आऊट केलं. विराट आऊट झाल्यानंतर आरसीबीची अवस्था 15 व्या ओव्हरमध्ये 4 आऊट 131 झाला आहे. 

IPL 2025 Final Live : RCB ला तिसरा धक्का, आता विराटवर मोठी भिस्त

आयपीएल फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या आरसीबीला तिसरा धक्का बसला. आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार 16 बॉलमध्ये 26 रन काढून आऊट झाला. जेमिसननं त्याला आऊट केले. आरसीबीच्या टॉप ऑर्डमधील 3 बॅटर टीमचा 100 स्कोअर होण्यापूर्वीच आऊट झाले आहेत. त्यामुळे आता आरसीबीची भिस्त एक बाजू लावून बॅटिंग करणाऱ्या विराट कोहलीवर आहे 

IPL 2025 Final Live : पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या RCB ला 2 मोठे धक्के

आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात फायनल लढत सध्या सुरु आहे. या मॅचमध्ये आरसीबीची सुरुवात खराब झाली आहे. फिल सॉल्ट 16 रन काढून आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आणि मयांक अग्रवाल यांनी इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण, मयांक देखील 24 रन काढून आऊट झाला. 

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: अशी आहे दोन्ही टीमची प्लेईंग 11

पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य,  जोश इंग्लिस (विकेटकीपर),  श्रेयस अय्यर (कॅप्टन),  नेहल वढेरा,  शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस,  अजमातुल्ला ओमरझाई,  विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल/हरप्रीत ब्रार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन/टिम डेव्हिड,  जितेश शर्मा (विकेटकीपर),  रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर, जोश कुमार, जॉश हेजलवूड

RCB vs PBKS Final Live Update : पंजाब किंग्जनं टॉस जिंकला, वाचा काय घेतला निर्णय?

आयपीएल फायनलमध्ये पंजाब किंग्जता कॅप्टन श्रेयस अय्यरनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही टीमनं त्यांच्या विजयी टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

IPL 2025 Final Live: अय्यर vs कोहली, 2 दिग्गजांवर सर्वांचं लक्ष

अय्यर vs कोहली (Kohli vs Iyer in IPL 2025) : या सिझनमध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोहलीने 14 मॅचमध्ये 614 रन्स केले आहेत. तर श्रेयसनं 16 मॅचमध्ये 603 रन्स काढले आहेत. विराटचा या सिझनमधील सर्वोच्च स्कोअर नाबाद 73 आहे. तर श्रेयसचा सर्वोच्च स्कोअर नाबाद 97 आहे. विराटनं 8 तर श्रेयसनं 6 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

IPL Final Live Update : अहमदाबादमध्ये मॅच दरम्यान किती पडणार पाऊस? वाचा प्रत्येक तासाचा अंदाज

आयपीएल 2025 ची फायनल मॅच आज (3 जून 2025) होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात फायनल होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मॅचमध्ये पावसाचं विघ्न येणार का?

PBKS vs RCB, IPL 2025 Final at 5:00 PM: 57% शक्यता

PBKS vs RCB, IPL 2025 Final at 6:00 PM: 51% शक्यता

PBKS vs RCB, IPL 2025 Final at 7:00 PM: 5% शक्यता

PBKS vs RCB, IPL 2025 Final at 8:00 PM: 2% शक्यता

PBKS vs RCB, IPL 2025 Final at 9:00 PM: 2% शक्यता

PBKS vs RCB, IPL 2025 Final at 10:00 PM: 2% शक्यता

PBKS vs RCB, IPL 2025 Final at 11:00 PM:  2% शक्यता

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: IPL 2025मध्ये पर्पल कॅप कोण जिंकणार?

IPL 2025 मधील वर्चस्वपूर्ण कामगिरीनंतर प्रसिध कृष्ण पर्पल कॅपच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे, ज्याने 15 सामन्यांत 19.52 च्या सरासरीने 25 विकेट्स पूर्ण केल्या आणि सीझनमधील त्याची सर्वोत्तम आकडेवारी 41 धावांवर 4 आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी खुलासा करणारा नूर अहमद २४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

IPL 2025 Final LIVE Updates: IPL 2025चा ऑरेज कॅप विजेता कोण?

आयपीएलच्या 18 व्या हंगामात गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन ऑरेंज कॅप जिंकत आहे. साईने 15 सामन्यांमध्ये 54.21 च्या सरासरीने 759 धावा केल्या आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील खेळाडू या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे साई सुदर्शन ऑरेंज कॅप जिंकणार हे निश्चित आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 16 सामन्यांमध्ये 65.18 च्या सरासरीने 717 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गिलने 15 सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने 650 धावा केल्या आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू मिचेल मार्श 13 सामन्यांमध्ये 627 धावा करून चौथ्या क्रमांकावर आहे.

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: किती वाजता सुरु होणार सामना?

सायंकाळी सात वाजता रंगणार आयपीएल फायनलचा थरार... गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि आरसीबीचा संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी आमने सामने येतील

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: अशी असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य,  प्रभसिमरन सिंग,  जोश इंग्लिस (विकेटकीपर),  श्रेयस अय्यर (कर्णधार),  नेहल वढेरा,  शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस,  अजमातुल्ला ओमरझाई,  विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल/हरप्रीत ब्रार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन/टिम डेव्हिड,  जितेश शर्मा (विकेटकीपर),  रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर, जोश कुमार, जॉश हेजलवूड, सुयश शर्मा

IPL 2025 Final LIVE Updates: दोन्ही कर्णधारांचे ट्रॉफीसोबत खास फोटोशूट

आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडणार आहे. त्याआधी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळोरच्या कर्णधारांनी चमचमत्या ट्रॉफीसोबत खास फोटोशूट केले...

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: आरसीबी विरुद्ध पंजाब... सर्वाधिक वेळा फायनलमध्ये कोण?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू किती वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे?

आयपीएल 2025 पूर्वी आरसीबी एकूण 3 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे परंतु त्यांना कधीही ट्रॉफी जिंकता आली नाही. आरसीबी 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता.

पंजाब किंग्ज किती वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे?

आयपीएल 2025 पूर्वी पंजाब फक्त एकदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, 2014 मध्ये त्यांना केकेआरकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून, ही टीम पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळणार आहे.

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळलेला संघ:

चेन्नई सुपर किंग्ज हा सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळणारा संघ आहे. त्यांनी एकूण 10 फायनल खेळले आहेत, त्यापैकी 5 जिंकले आहेत आणि तेवढ्याच वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स 6 वेळा आयपीएल फायनलमध्ये पोहोचला आहे, त्यापैकी फक्त 1 वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कोणी जिंकला?

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकण्याचा विक्रम सुनील नरेनच्या नावावर आहे. त्याने हा पुरस्कार 2012, 2014 आणि 2018 असा 3 वेळा जिंकला आहे.

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: आयपीएलचे आत्तापर्यतचे उपविजेते संघ:

2008: चेन्नई सुपर किंग्स

2009: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु

2010: मुंबई इंडियन्स

2011: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु

2012: चेन्नई सुपर किंग्स 

2013: चेन्नई सुपर किंग्स 

2014: पंजाब किंग्स 

2015: चेन्नई सुपर किंग्स 

2016: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु

2017: राइज़िंग पुणे सुपरजायंट्स

2018: सनराइजर्स हैदराबाद

2019: चेन्नई सुपर किंग्स 

2020: दिल्ली कैपिटल्स

2021: कोलकाता नाइट राइडर्स

2022: राजस्थान रॉयल्स

2023: गुजरात टाइटंस

2024: सनराइजर्स हैदराबाद

IPL 2025 Final LIVE Updates: 2008 ते 2024... आयपीएलचे आजपर्यंतचे विजेते संघ

आयपीएल 2008 : राजस्थान रॉयल्स

आयपीएल 2009 : डेक्कन चार्जर्स

आयपीएल 2010 : चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएल 2011 : चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएल 2012 : कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएल 2013 : मुंबई इंडियन्स

आयपीएल 2014 : कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएल 2015 : मुंबई इंडियन्स

आयपीएल 2016 : सनरायझर्स हैदराबाद

आयपीएल 2017 : मुंबई इंडियन्स

आयपीएल 2018 : चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स

आयपीएल 2020 : मुंबई इंडियन्स

आयपीएल 2021 : चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएल 2022 : गुजरात टायटन्स

आयपीएल 2023 : चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएल 2024 : कोलकाता नाईट रायडर्स

RCB Vs PBKS IPL Final Live Updates: आयपीएलचा विजेता कोण होणार? AI ने केलं भाकित

ग्रोक: या सामन्यावरील एलोन मस्कच्या प्लॅटफॉर्म 'ग्रोक' मध्ये म्हटले आहे की आरसीबीला विजेतेपद मिळण्याची जास्त शक्यता आहे.

चॅटजीपीटी: एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीने भाकित केले आहे की आरसीबीचा सध्याचा फॉर्म आणि पंजाबविरुद्धच्या अलिकडच्या विजयामुळे ते विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

 

जेमिनी: एआय गुगल जेमिनीने भाकीत केले की आरसीबी थोडीशी फायदेशीर स्थितीत आहे.

IPL 2025: आयपीएलला मिळणार सातवा चॅम्पियन

आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत 7 संघांनी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानावर आहेत. आयपीलच्या विजेत्या  राजस्थान रॉयल्स (2008), डेक्कन चार्जर्स (2009), चेन्नई सुपर किंग्स (2010, 2011, 2018, 2021, 2023), कोलकाता नाइट राइडर्स (2012, 2014, 2024), मुंबई इंडियंस (2013, 2015, 2017, 2019, 2020), सनराइजर्स हैदराबाद (2016) आणि गुजरात टाइटंस (2022) आता, 2025 मध्ये कोण जिंकले तरी, आयपीएलचा 8 वा नवीन चॅम्पियन निश्चित आहे.

IPL 2025 Final: जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोण ठरणार चॅम्पियन? नियम काय सांगतात?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 चा क्वालिफायर-2 पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. हा सामना जवळपास दोन तास उशिरा सुरू झाला. कारण नाणेफेकीनंतर लगेचच पावसाने हजेरी लावली होती.   दोन तास पाऊस होता. त्यानंतर रात्री पावणे दहा वाजता सामना सुरू झाला. अहमदाबादला पाऊस होईल अशी कोणतीही शक्यता वर्तवण्यात आली नव्हती. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे एकच धावपळ उडाली. त्यात क्वालिफायर-2 साठी कोणताही राखीव दिवस (Reserve Day) नव्हता. मात्र, एकदा सामना सुरू झाल्यावर पावसाने पुन्हा अडथळा आणला नाही. शेवटी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स, दोन्ही संघ पहिल्या हंगामापासून लीगचा भाग आहेत. शिवाय दोन्ही संघ आपल्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या हंगामात नवीन विजेता मिळणे निश्चित आहे. पण फायनल मॅच वेळी ही  अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा मात्र हिरमोड होऊ शकतो.

फायनलच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शहरात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत तापमान कमी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. सकळा तापमान 38 अंश सेल्सिअस असेल संध्याकाळी ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येवू शकते.  Accuweather नुसार, दिवसा एक तास पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, संध्याकाळच्या वेळीही पाऊस पडू शकतो.

जर सामना रद्द झाला, तर काय होईल?

नॉक-आउटमधील इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्यासाठीही 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. परंतु, जर 3 जून रोजी पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर 4 जून रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.  या दिवशी सामन्याचा निकाल येऊ शकतो. पण सामना जर पावसामुळे रद्द झाला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. पण जर दोन्ही दिवशी पावसामुळे सामन्याचा निकाल येऊ शकला नाही, तर पंजाब किंग्सला चॅम्पियन म्हणून घोषीत केले जाईल. त्यांना आयपीएल 2025 ची ट्रॉफी मिळेल. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे ते गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुपेक्षा वर होते.

Live Update : RCB फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या 'EE Sala Cup Namade' या घोषणेचा अर्थ काय?

जगभरातील आरसीबी फॅन्स EE Sala Cup Namade ही घोषणा मोठ्या श्रद्धेनं देतात. त्यामुळे सर्व क्रिकेट फॅन्सना ही घोषणा माहिती आहे. पण, याचा अर्थ सर्वांना माहिती नाही. हा एक कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

EE Sala - या वर्षी

Cup Namde - कप आमचा आहे.

थोडक्यात EE Sala Cup Namde म्हणजे यावर्षी कप आमचा आहे, असा या घोषणेचा अर्थ आहे.


Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com