पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 223 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मार्कस स्टोइनिसच्या तुफानी फलंदाजीमुळे पंजाबला ही धावसंख्या उभारता आली. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, जो स्टोइनिसने चुकीचा ठरवला. स्टोइनिसने जवळपास 281 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटून राजस्थानच्या अडचणी वाढवल्या. इतर फलंदाजांची ही त्याला साथ मिळाली.
पंजाबच्या 223 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक सुरूवात केलीय. वैभवने आपल्या शैलीत पंजाबच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. वैभव सुर्यवंधी 16 चेंडूत 43 धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने 5 सिक्स लगावले. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि यशस्वीने डाव सावरला. पॉवर प्लेमध्ये राजस्थानने 84 धावा केल्या. त्यानंतर यशस्वीने आपले अर्धशतक पुर्ण केले. तो 27 चेंडूत 51 धावा काढून बाद झाला. ध्रुव जुरेल ही जास्त काही करू शकला नाही. या दोघांना ही युजवेंद्र चहलने आऊट केले. राजस्थानने 223 धावांचे लक्ष वीसाव्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. शुभब दुबे आणि फरेरा यांनी फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळून दिला. पंजाबचा हा आयपीएल मधील पहिला पराभव ठरला.
पंजाब किंग्सकडून सलामीला आलेल्या प्रियांश आणि प्रभसिमरन सिंह यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. प्रियांश 29 धावा करून बाद झाला. त्याला जोफ्रा आर्चरने तंबूत धाडले. त्यानंतर कूपर कोनोली आणि प्रभसिमरन यांनी 33 चेंडूत 59 धावांची जलद भागीदारी केली. कोनोलीने 14 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. प्रभसिमरन सिंहने आपले अर्धशतक पूर्ण करत 59 धावांची खेळी केली.
एकवेळ पंजाबला 200 धावांचा टप्पा पार करणे कठीण वाटत होते. मात्र, मार्कस स्टोइनिसने मैदानात येताच खेळाचे चित्र बदलले. त्याने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. स्टोइनिसने 22 चेंडूत नाबाद 62 धावा कुटल्या. ज्यात 4 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याने 281.82 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. पंजाबने शेवटच्या 3 षटकांत 5 धावा वसूल केल्या, ज्यामुळे त्यांचा स्कोअर 222 पर्यंत पोहोचला.
PROPER CARNAGE! 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2026
🎥 6️⃣, 4️⃣, 4️⃣ and Marcus Stoinis finishes as the highest scorer of the innings 🤯
Updates ▶️ https://t.co/fBbdVnF5Fx#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvRR | @punjabkingsipl pic.twitter.com/PvxdPYqyDy
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world