जाहिरात

IPL 2025 Final : Ee Sala Cup Namdu, कोहलीचं 'विराट' स्वप्न पूर्ण, RCB पहिल्यांदाच चॅम्पियन!

IPL 2025 Final Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings : दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आणि 74 मॅचनंतर अखेर आयपीएल 2025 ला विजेता मिळाला आहे.

IPL 2025 Final : Ee Sala Cup Namdu, कोहलीचं 'विराट' स्वप्न पूर्ण, RCB पहिल्यांदाच चॅम्पियन!
IPL 2025 RCB Champion : आयपीएल विजेतेपद पटकावण्याचं आरसीबीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.
मुंबई:

IPL 2025 Final Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings : दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आणि 74 मॅचनंतर अखेर आयपीएल 2025 ला विजेता मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात आयपीएलचा फायनल सामना झाला. दोन्ही टीमनं यापूर्वी एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावले नव्हते. त्यामुळे ही फायनल दोन्ही टीमसाठी खास होती. त्यामध्ये अखेर आरसीबी यशस्वी ठरली आहे. आरसीबीनं पंजाबचा रन्सनं पराभव करत विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण केलं. आरसीबीनं पंजाब किंग्जचा 6 रननं पराभव करत विजेतेपद मिळवलं. 

आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 आऊट 190 रन्स केले. 191 रन्सचा पाठलाग करत असताना पंजाब किंग्जला चांगल्या सुरुवतीची गरज होती. पंजाबनं आक्रमक पद्धतीनं सुरुवात केली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंहनं पहिल्या विकेटसाठी 43 रन्सची पार्टनरशिप केली.

जोश हेजलवूडनं ही जोडी फोडली. फिल सॉल्टनं प्रियांश आर्याचा भन्नाट कॅच घेत आरसीबीला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर आरसीबीनं मॅचमध्ये कमबॅक केलं. प्रभसिमरन सिंह 26 रन्स काढून आऊट झाला. तर रोमारियो शेपर्डनं पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) फक्त 1 रनवर आऊट करत पंजाबला मोठा धक्का दिला. पंजाबला कॅप्टन श्रेयसकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, फायनलमध्ये त्यानं निराशा केली.

श्रेयसनंतर जोश इंग्लिसही रनरेट वाढवण्याच्या नादात आऊच झाला. त्याला कृणाल पांड्यानं 39 रन्सवर आऊट केलं. आरसीबीकडून कृणाल पांड्यानं भन्नाट बॉलिंग केली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 17 रन्स देत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.


RCB ची बॅटिंग कशी झाली?

त्यापूर्वी आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 190 रन्स केले. आरसीबीकडून एकालाही हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही. विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वात जास्त 43 रन्स केले. 

( नक्की वाचा : IPL 2025 Final : आयपीएल फायनलमध्ये विराट कोहलीनं केला मोठा रेकॉर्ड, एक फोर लगावत रचला इतिहास!)
 

आरसीबीकडून फिल सॉल्टनं 16, रजत पाटीदारनं 26, मयांक अग्रवालनं 24 रन्स केले. लियाम लिव्हिंगस्टोननं 15 बॉलमध्ये 25 रन केले. या दोघांनी वेगानं रन्स करत वेगानं रन वाढवण्याचा प्रयत्न केले. पण, आरसीबीच्या एकाही बॅटरला मोठा स्कोर करता आला नाही.

पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग आणि जेमीसननं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर ओमरझाई, विजयकुमार आणि चहलनं प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com