IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीचा होम ग्राऊंडवर पराभव केला आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला. मात्र सामना संपल्यानंतर मैदानात घडलेला एक ड्राम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगला जोरदार थापड मारल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुलदीपने रिंकूला एकदा नाही तर दोनदा गालावर मारलं. कुलदीपच्या या वागण्यामुळे रिंकूचा चेहराच पडला.
व्हिडीत दिसत आहे की, सामना संपल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे काही खेळाडू मैदानावर एकत्र उभे होते. सगळे एकमेकांशी बोलत असताना कुलदीपने गंमतीने रिंकू सिंगला थापड मारली. अर्थात कुलदीपने त्याला मस्करीत मारले, पण रिंकूचा चेहराच पडला. त्यानंतर कुलदीपने पुन्हा एकदा रिंकूला थापड मारली. यानंतर रिंकू काहीसा चिडलेला दिसला.
दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रिंकूने 25 चेंडूत 36 धावांची महत्त्वाची खेळी केली. या खेळीदरम्यान, रिंकूने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये रिंकूची कामगिरी काही खास राहिलेली नाही. रिंकूने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये फक्त 169 धावा केल्या आहेत.