
IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीचा होम ग्राऊंडवर पराभव केला आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला. मात्र सामना संपल्यानंतर मैदानात घडलेला एक ड्राम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगला जोरदार थापड मारल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुलदीपने रिंकूला एकदा नाही तर दोनदा गालावर मारलं. कुलदीपच्या या वागण्यामुळे रिंकूचा चेहराच पडला.
व्हिडीत दिसत आहे की, सामना संपल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे काही खेळाडू मैदानावर एकत्र उभे होते. सगळे एकमेकांशी बोलत असताना कुलदीपने गंमतीने रिंकू सिंगला थापड मारली. अर्थात कुलदीपने त्याला मस्करीत मारले, पण रिंकूचा चेहराच पडला. त्यानंतर कुलदीपने पुन्हा एकदा रिंकूला थापड मारली. यानंतर रिंकू काहीसा चिडलेला दिसला.
Yo kuldeep watch it pic.twitter.com/z2gp4PK3OY
— irate lobster🦞 (@rajadityax) April 29, 2025
दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रिंकूने 25 चेंडूत 36 धावांची महत्त्वाची खेळी केली. या खेळीदरम्यान, रिंकूने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये रिंकूची कामगिरी काही खास राहिलेली नाही. रिंकूने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये फक्त 169 धावा केल्या आहेत.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन? )
आतापर्यंत सीजनमध्ये रिंकूला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. रिंकूची सर्वोच्च धावसंख्या 38 धावा आहे. रिंकूच्या खराब फॉर्मचा परिणाम कोलकाता नाईट रायडर्सच्या कामगिरीवरही दिसून येतो. कारण मधल्या फळीतला तो महत्त्वाचा खेळाडू आहे. केकेआरने या हंगामात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाला फक्त 4 सामने जिंकता आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world