
IND vs ENG, Rishabh Pant : टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी मोठी दुखापत होऊनही बॅटिंगसाठी मैदानात उतरला. या टेस्टच्या पहिल्या दिवशी, इंग्लंडचा फास्ट बॉलर ख्रिस वोक्सच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करताना ऋषभ पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली आणि तो 37 रन्सवर असताना रिटायर्ड हर्ट झाला. दुखापतीनंतर पंत वेदनेत होता आणि त्याचा पाय सुजला होता, तसेच दुखापतीतून रक्त येत होते. त्यामुळे या इनिंगमध्ये तो पुन्हा खेळणार की नाही? हा मोठा प्रश्न भारतीय फॅन्सना सतावत होता. जिगरबाज पंतनं त्याच्यातील झुंजार वृत्तीचं दर्शन दाखवत टीमला गरज असताना पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला. त्याच्या लढाऊ वृत्तीनं सर्वांची मनं जिंकली.
पंत बॅटिंगसाठी मैदानावर आला, तेव्हा त्याने आपल्या दुखापतग्रस्त पायाला आधार देण्यासाठी 'मून बूट' (एक संरक्षणात्मक ऑर्थोपेडिक बूट) घातला होता. मात्र, बीसीसीआयने तो फलंदाजीसाठी उपलब्ध असल्याचे निश्चित केले आणि शार्दुल ठाकूर बाद झाल्यानंतर तो फलंदाजीसाठी मैदानात येताच फॅन्सने जल्लोष केला. शार्दुलने मैदान सोडण्यापूर्वी पंत येण्याची वाट पाहिली आणि मैदानातून बाहेर पडताना त्याच्या डोक्यावर थापही मारली.
Here comes Rishabh Pant...
— England Cricket (@englandcricket) July 24, 2025
A classy reception from the Emirates Old Trafford crowd 👏 pic.twitter.com/vBwSuKdFcW
पंतबद्दल BCCI नं काय सांगितलं?
"मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे, ऋषभ पंत उर्वरित सामन्यात विकेट किपिंगची भूमिका बजावणार नाही. ध्रुव जुरेल विकेट किपिंगची भूमिका सांभाळेल," असे बीसीसीआयने 'X' वर पोस्ट केले.
"दुखापत असूनही, ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी टीम सामील झाला आहे आणि टीमच्या गरजेनुसार तो बॅटींगसाठी उपलब्ध असेल," असेही बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
( नक्की वाचा : IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत ॲम्ब्युलन्सने मैदानाबाहेर, वाचा नेमकं काय घडलं? Video )
टीम इंडियाचा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी यापूर्वीच गुडघ्याच्या त्रासामुळे या सीरिजमधून बाहेर पडलाय. फास्ट बॉलर आकाश दीप आणि अर्शदीप सिंग अनुक्रमे ग्रोइनच्या दुखण्यामुळे आणि बोटाच्या दुखापतीमुळे ही टेस्ट खेळू शकले नाहीत. पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world