IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2025 : आयपीएल विजेत्या कॅप्टनला खरेदी करण्यासाठी यंदा मोठी चुरस आहे.
मुंबई:


IPL 2025 Mega Auction : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) आयपीएल 2024 मध्ये अनेकांना चकित करत विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदानंतर होणाऱ्या पहिल्याच ऑक्शनमध्ये केकेआरनं त्यांना हे विजेतेपद मिळवून देणारा कॅप्टन श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) रिलीज केलं. केकेआरनं श्रेयसला रिटेन न केल्यानं यंदा होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यर खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्याला खरेदी करण्यासाठी मोठी बोली लागणार असा सर्वांचाच अंदाज आहे. कोणकोणत्या टीममध्ये श्रेयसला खरेदी करण्यासाठी चढाओढ लागलीय पाहूया

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) 

दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत आता वेगळे झाले आहेत. त्यामुळे दिल्लीला नव्या कॅप्टनची गरज आहे. त्यासाठी श्रेयस हा सर्वात चांगला पर्याय ठरु शकतो. श्रेयसच्याच कॅप्टनसीमध्ये दिल्लीनं आयपीएल फायनल गाठली होती. 

श्रेयस मिडल ऑर्डरमधील उपयुक्त बॅटर असून त्याची ही खासियत लक्षात घेऊन दिल्ली त्याच्यावर मोठी बोली लावू शकते. त्याचबरोबर स्पिन बॉलर्सवर वर्चस्व गाजवण्याची त्याची क्षमता देखील आणखी एक जमेची बाजू आहे. 

Advertisement

( नक्की वाचा :  IPL 2025 Auction : टीम इंडियासाठी 'करुन दाखवलं' राजस्थानमध्ये होणार? राहुल द्रविड कुणाला निवडणार? )

पंजाब किंग्ज (Punjab Kings)

गेल्या काही सिझनप्रमाणे यंदाही पंजाब किंग्ज सर्वाधिक रक्कम घेऊन ऑक्शनमध्ये उतरणार आहे. पंजाबनं फक्त दोन अनकॅप खेळाडूंना रिटेन केलंय. त्यामुळे त्यांना संपूर्ण टीम नव्यानं तयार करायची आहे. ऋषभ पंत पंजाबच्या मेन टार्गेट असला तरी ते श्रेयस अय्यरसाठीही मोठी बोली लावू शकतात. ऋषभ प्रमाणे श्रेयस अय्यरनंही पंजाबचा कोच रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनात आयपीएलचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे पंत आणि अय्यर ही जोडी पुन्हा एकत्र आणण्याचा पंजाबचा प्रयत्न असू शकतो. मिडल ऑर्डरमध्ये एक भक्कम खेळाडू घेण्यासाठीही पंजाब श्रेयसवर मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (आरसीबी) विराट कोहली आणि रजत पाटीदार हे टॉप ऑर्डरमधील दोन बॅटर रिटेन केले आहेत. आरसीबी केएल राहुलला टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक आहे, अशी माहिती वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

Advertisement

( नक्की वाचा :  IPL 2025 Mega Auction : 17 वर्षांचा मुंबईकर होणार CSK मध्ये ऋतुराजचा जोडीदार? धोनीही झाला प्रभावित )

आरसीबीला राहुलला खरेदी करण्यात अपयश आलं तर श्रेयस अय्यर त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. राहुलनं यापूर्वीच्या दोन आयपीएल फ्रँचायझीसाठी ओपनर्सची भूमिका बजावलीय. तर श्रेयस आरसीबीच्या मिडल ऑर्डरला स्थिरता देण्याचं काम करु शकतो. 

Advertisement
Topics mentioned in this article