IPL 2025 Mega Auction, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी सर्वात कमी खेळाडू खरेदी केले. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या टीमनं पाच भारतीय खेळाडूंना ऑक्शनपूर्वीच रिटेन केले होते. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या पाच भारतीय खेळाडूंना मुंबई इंडियन्सनं रिटेन केलं आहे. त्यानंतर ऑक्शनच्या दिवशी चार नव्या खेळाडूंना मुंबईच्या मॅनेजमेंटनं खरेदी केलंय.
मुंबई इंडियन्सचं त्यांचा जुना फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) 12 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं. त्यानंतर करन शर्मा, नमन धीर (RTM) आणि रॉबिन मिन्झ या आणखी तीन खेळाडूंना खरेदी केलं. आयपीएल टीम तयार करण्यासाठी किमान 9 खेळाडूंची आवश्यकता असते. मुंबई इंडियन्सकडं अद्याप 26 कोटी 10 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांना अनेक चांगले खेळाडू घेण्याची संधी आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 Mega Auction Day 2 Live Updates : आज कोणत्या खेळाडूंना लागणार सर्वात जास्त बोली? )
कुणाचा होणार मुंबईच्या पलटनमध्ये समावेश?
मुंबई इंडियन्सनं अद्याप प्लेईंग XI साठी आवश्यक असलेले 11 खेळाडू देखील खरेदी केलेले नाहीत. मुंबईनं चार दिग्गज खेळाडूंना रिटेन केलंय. तर मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या जोडीला ट्रेंट बोल्टला खरेदी केलंय. पण, मुंुबईला बुमराहच्या मदतीसाठी आणखी काही बॉलर्सची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आणखी 7 परदेशी खेळाडूंनाही खरेदी करण्याची त्यांना संधी आहे.
मुंबई इंडियन्सला सध्या चांगल्या ऑल राऊंडरची गरज आहे. ती जागा मार्को यान्सन, सॅम करन आणि विल जॅक्स हे खेळाडू भरुन काढू शकतात. त्याचबरोबर सिकंदर रझा आणि मोईन अली हे उपयुक्त ऑलराऊंडरही मुंबईच्या रडारवर असू शकतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डावखुरे फास्ट बॉलर खरेदी करण्याची मुंबईची परंपरा आहे. त्यासाठी स्पेनसर जॉन्सन, मुस्तफिजूर रहमान, जेसन बेहरनड्रॉफ आणि फजल फारुखी हे पर्याय त्यांच्यासमोर आहेत.
मुंबई इंडियन्सचा काही भारतीय खेळाडूंवरही विशेष फोकस असेल. वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, आकाश दीप, युधवीर सिंह चरक या खेळांडू ते बोली लावू शकतात. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सध्या फक्त रॉबिन मिन्झ हा एकमेव विकेटकिपर आहे. त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता कमी वाटतीय. दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर-बॅटक रायन रिकेल्टनला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स जोरदार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. रायन हा मुंबई इंडियन्सची दक्षिण आफ्रिकेतील टीम MI केपटाऊनचा सदस्य आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world