जाहिरात
1 hour ago
मुंबई:

IPL 2025 Mega Auction Live updates : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी 83 खेळाडूंचे ऑक्शन पार पडले. या ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडू शॉर्टलिस्ट झाले आहेत. त्यामुळे आज (सोमवारी) देखील अनेक दिग्गज तसंच नवोदीत खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर 20 कोटींपेक्षा जास्त बोली लागली. तर युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 18 कोटी रुपये मिळाले. आता दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंना मोठा भाव मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

 आयपीएल मेगा ऑक्शनमधील सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी हे पेज नियमित रिफ्रेश करा.


 

IPL 2025 Mega Auction Live Updates : मुंबईचा आक्रमक बॅटर RCB मध्ये दाखल

मुंबई इंडियन्सकडून गेली तीन सिझन खेळलेला आक्रमक बॅटर टीम डेव्हिड (Tim David) आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळणार आहे. डेव्हिड मुळचा सिंगापूरचा असून आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आहे. त्याला RCB नं 3 कोटी रुपयांना खरेदी केले. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : मुंबई इंडियन्सची Playing XI ठरली?

आयपीएल 2025 मधील मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 जवळपास निश्चित झाली आहे. पाहूया कशी आहे ही प्लेईंग 11

रोहित शर्मा

रायन रिकल्टन (WK)

सूर्यकुमार यादव

विल जॅक्स

तिलक वर्मा

हार्दिक पांड्या (कॅप्टन)

नमन धीर

दीपक चहर

ट्रेंट बोल्ट

जसप्रीत बुमराह

अल्लाह गझनफर

रॉबिन मिन्झ (इम्पॅक्ट)

IPL 2025 Mega Auction Live Updates : का इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरला कुणी केलं खरेदी?

हरयणाचा फास्ट बॉलर अंशुल कंबोजनं नुकताच रणजी क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या काही महिन्यापासून फॉर्मात असण्यासाठी अंशुलला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये जोरदार स्पर्धा रंगली. अखेर चेन्नई सुपर किंग्जनं 3 कोटी 40 लाख रुपयांना अंशुलला खरेदी केलं आहे. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : मुंबई इंडियन्समध्ये 18 वर्षांच्या खेळाडूची एन्ट्री

मुंबई इंडियन्सनं अफगाणिस्तानचा 18 वर्षांच्या स्पिनरला 4 कोटी 80 लाख रुपयांची यशस्वी बोली लावून खरेदी केलं. अफगाणिस्तानच्या स्पिन बॉलिंगचं भविष्य मानलं जाणाऱ्या अल्लाह गझनफरला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये जोरदार चुरस रंगली होती. अखेर मुंबईनं गझनफरला खरेदी केलं. त्यामुळे आगामी सिझनमध्ये तो मुंबईचा मुख्य स्पिनर ठरला आहे. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : अनुभवी भुवनेश्वर कुमारवर मोठी बोली

टीम इंडियाचा अनुभवी बॉलर भुवनेश्वर कुमारला नवी टीम मिळाली आहे. भुवनेश्वर कुमारला खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस रंगली होती. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं भुवनेश्वरला 10 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : मुंबई इंडियन्सकडून विकेटकिपरची खरेदी

मुंबई इंडियन्सनं दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर रायन निकेलटनला खरेदी केलं आहे. मुंबईनं रायनला 1 कोटीमध्ये खरेदी केलं.  आगामी सिझनमध्ये रायन रोहित शर्मासोबत मुंबईच्या इनिंगची सुरुवात करु शकतो. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : कृणाल पांड्या RCB कडून खेळणार

लखनौ सुपर जायंट्सकडून मागील काही सिझन खेळणाऱ्या कृणाल पांड्याला (Krunal Pandya) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) खरेदी केलं. आरसीबीनं कृणालला 5 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केलं. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : आफ्रिकन ऑल राऊंडरला चांगली बोली

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सावध झाली. पहिल्या सेटमधील अनेक खेळाडू अनसोल्ड ठरले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर मार्को यान्सनला (Marco Jansen) खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस रंगली.

अखेर पंजाब किंग्ज (Punjab Kings) मार्कोला 7 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : CSK ची परंपरा कायम, जुना खेळाडू खरेदी

चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) जुन्या खेळाडूंवर विश्वास दाखवण्याची परंपरा कायम राखलीय. सीएसकेनं इंग्लंडचा ऑल राऊंडर सॅम करनला 3 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केलंय.

IPL 2025 Mega Auction Live Updates :3 मुंबईकरांना धक्का, लिलावात बोली नाही

यापूर्वीच्या आयपीएलमध्ये खेळलेल्या मुंबईकरांना दुसऱ्या दिवशी धक्का बसला. अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर आणि पृथ्वी शॉ या खेळाडूंना कुणीही बोली लावली नाही. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : 2 बडे खेळाडू अनसोल्ड

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात सर्व फ्रँचायझींनी सावध केली. केन विल्यमसन आणि ग्लेन फिलिप्स हे दोन बडे खेळाडू अनसोल्ड ठरले.  त्यांना कोणत्याही टीमनं खरेदी केलं नाही. 

IPL 2025 Mega Auction Live Updates : कोणत्या टीमकडे किती रक्कम शिल्लक?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) - 30.65 कोटी

मुंबई इंडियन्स (MI) - 26.1 कोटी

पंजाब किंग्ज (PBKS) - 22.5 कोटी

गुजरात टायटन्स (GT) - 17.5 कोटी 

राजस्थान रॉयल्स (RR) - 17.35 कोटी

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) - 15.36 कोटी

लखनौ सुपर जायंट्स (LSG) - 14.85 कोटी

दिल्ली कॅपिटल्स (DC) - 13.8 कोटी

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) - 10.5 कोटी

सनरायझर्स हैदराबाद (SRH) - 5.5 कोटी 

IPL 2025 Mega Auction Live Updates : दुसऱ्या दिवशी कोणत्या प्रमुख खेळाडूंवर लागणार बोली?

मयांक अगरवाल - भारत - 1 कोटी 

फाफ ड्यू प्लेसिस - दक्षिण आफ्रिका - 2 कोटी

ग्लेन फिलिप्स - न्यूझीलंड - 2 कोटी

रोव्हमन पॉवेल - वेस्ट इंडिज - 1.5 कोटी

अजिंक्य रहाणे - भारत - 1.5 कोटी

पृथ्वी शॉ - भारत - 75 लाख

केन विल्यमसन - न्यूझीलंड - 2 कोटी

सॅम करन - इंग्लंड - 2 कोटी

मार्को यान्सन - दक्षिण आफ्रिका - 2 कोटी

डॅरेल मिचेल - न्यूझीलंड - 2 कोटी

कृणाल पांड्या - भारत - 2 कोटी 

वॉशिंग्टन सुंदर - भारत - 2 कोटी

शार्दुल ठाकूर - भारत - 2 कोटी

दीपक चहर - भारत - 2 कोटी

भुवनेश्वर कुमार - भारत - 2 कोटी

तुषार देशपांडे - भारत - 2 कोटी

मनिष पांडे - भारत - 75 लाख

मोईन अली - इंग्लंड - 2 कोटी

टीम डेव्हिड - ऑस्ट्रेलिया - 1.3 कोटी 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com