जाहिरात

PBKS vs RCB, Qualifier 1: श्रेयस अय्यरची काय झाली अवस्था... कुणीही केली नव्हती कल्पना!

Shreyas Iyer vs Josh Hazlewood: तब्बल 11 वर्षांनंतर प्ले ऑफमध्ये आलेल्या पंजाब किंग्जला कॅप्टन श्रेयस अय्यरकडून मोठी अपेक्षा होती.

PBKS vs RCB, Qualifier 1: श्रेयस अय्यरची काय झाली अवस्था... कुणीही केली नव्हती कल्पना!
मुंबई:

Shreyas Iyer vs Josh Hazlewood: तब्बल 11 वर्षांनंतर प्ले ऑफमध्ये आलेल्या पंजाब किंग्जला कॅप्टन श्रेयस अय्यरकडून मोठी अपेक्षा होती.  पंजाब किंग्जचे फॅन्स मोठ्या अपेक्षेनं मुल्लानपूरमध्ये क्वालिफायर-१ (Qualifier 1) चा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जमले होते. पण बेंगळूरुच्या (Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru) गोलंदाजांनी त्यांची जी अवस्था केली, त्यावर कुणाचाही विश्वास बसला नाही. ब्रेकनंतर परतलेला आरसीबीचा फास्ट बॉलर जोश हेजलवुडने तर दोन मोठ्या विकेट्स घेऊन पंजाबला मोठा धक्का दिला. त्यानं श्रेयस अय्यर आणि जोश इंग्लिसची आऊट केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अय्यरवर पुन्हा हेजलवुडची सरशी!

या मॅचपूर्वी जॉश हेजलवूज विरुद्ध श्रेयस अय्यर यांच्यातील लढतीची मोठी चर्चा होती. यापूर्वी  हेजलवुडने अय्यरला अक्षरशः गारद केले होते. आणि यावेळीही एका मोठ्या मॅचमध्ये तो अय्यरवर सरस ठरला. 

आयपीएलमध्ये पंजाबच्या कॅप्टननं हेजलवुडविरुद्ध 6 इनिंगमध्ये बॅटिंग केली आहे. अय्यरनं त्याच्या विरुद्ध 22 बॉल खेळले आहेत. यामध्ये त्यानं फक्त 11 रन्स केले असून तो 4 वेळा आऊट झाला आहे. श्रेयस अय्यरची हेजलवूडविरुद्ध सरासरी फक्त 2.75 इतकी केविलवाणी आहे. 

( नक्की वाचा : IPL 2025: मुंबई इंडियन्स यंदा राहणार ट्रॉफीपासून दूर, 'हा' विचित्र योग आहे कारण! )
 

हेजलवूड पर्पल कॅपच्या दिशेने!

हेजलवूडनं पंजाबविरुद्ध तीन विकेट्स घेत पर्पल कॅपच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. त्यानं या मॅचमध्ये 3.1 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. हेजलवूडनं आत्तापर्यंत 11 मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या असून तो सध्या या शर्यतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.आता त्याच्या पुढे फक्त नूर अहमद (24) आणि प्रसिद्ध कृष्णा (23) हेच दोघे आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com