IPL 2025 : आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. फर्ग्युसस सीजनमध्ये चमकदार कामगिरी करत होता. मात्र त्यांच्या जाण्याने पंजाब किंग्सजी गोलंदाजी काहीशी कमकुवत होण्याची श्क्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान फर्ग्युसनने सहाव्या षटकाचा दुसरा चेंडू टाकल्यानंतर अचानक गोलंदाजी थांबवली होती. डाव्या पायाला दुखापत झाल्याने तेव्हाच तो मैदानाबाहेर गेला होता. फिजिओशी बोलल्यानंतर तो पुन्हा गोलंदाजी करायला परतला देखील नाही. या सामन्यात, हैदराबादने पंजाबवर ऐतिहासिक विजय मिळवला.
फर्ग्युसनची जागा कोण घेणार?
पंजाब किंग्जकडे फर्ग्युसनची जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाई देखील संघात आहे. पंजाबकडे भारतीय खेळाडू म्हणून विजय कुमार वैशाखसारखा खेळाडू देखील आहे. वैशाखने या हंगामात फक्त एकच सामना खेळला आहे आणि त्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे.
(नक्की वाचा - IPL 2025 : लखनौनं रोखली गुजरातची घौडदौड, पॉईंट टेबलमध्ये केली उलथापालथ)
फर्ग्युसन तिसऱ्यांदा दुखापतग्रस्त
नोव्हेंबर 2024 नंतर फर्ग्युसनची ही तिसरी दुखापत आहे. फेब्रुवारीमध्ये यूएईमध्ये झालेल्या आयएलटी 20 दरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला होता. गेल्या वर्षीच्या अखेरीस त्याला पायाच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलाही मुकावे लागले होते