जाहिरात

IPL 2025 Final : नवरा की RCB? या महिलेच्या अटीनं सर्वच चकित! प्रिय विराट, आता तूच सांभाळ...

IPL 2025 RCB vs PBKS Final : गेल्या अठरा वर्षांपासून आरसीबीचे फॅन्स त्यांची टीम आयपीएल ट्रॉफी कधी उचलणार याची वाट आहेत. या फॅन्सचं आरसीबीवर इतकं प्रेम आहे की हे त्यांच्य जवळच्या लोकांनाही सोडायला तयार आहेत. 

IPL 2025 Final : नवरा की RCB? या महिलेच्या अटीनं सर्वच चकित! प्रिय विराट, आता तूच सांभाळ...
मुंबई:

IPL 2025 RCB vs PBKS Final : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला आज (3 जून)  नवीन विजेता मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात फायनलचा महामुकाबला होत आहे. यापैकी जी टीम जिंकेल ती पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उचलेल. अर्थात विराट कोहलीच्या आरसीबीचे श्रेयस अय्यरच्या पंजाबपेक्षा अधिक फॅन्स आहेत, असा निष्कर्ष काढला तर चुकीचा नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गेल्या अठरा वर्षांपासून आरसीबीचे फॅन्स त्यांची टीम आयपीएल ट्रॉफी कधी उचलणार याची वाट आहेत. या फॅन्सचं आरसीबीवर इतकं प्रेम आहे की हे त्यांच्य जवळच्या लोकांनाही सोडायला तयार आहेत.  अलीकडेच, आरसीबीचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका महिला चाहत्याने स्टँड्समधून घोषणा केली होती की, जर यावेळी आरसीबी जिंकली नाही, तर ती तिच्या पतीला घटस्फोट देईल. आता आरसीबीवर या महिलेचे (Kohli fan divorce news) घर तुटण्यापासून वाचवण्याचाही दबाव असेल.

महिलेचा घटस्फोटाचा फतवा (Viral Fan Story)

क्वालिफायर 1 च्या सामन्यात आरसीबीने पंजाबला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. हा सामना मोहालीच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झाला होता. तिथे ही फॅन याबाबतचा खास बोर्ड घेऊन आली होती. या बोर्डनं सर्वांचं लक्ष वेधलं.

आरसीबी यापूर्वी तीनवेळा (2009, 2011 आणि 2016) फायनलमध्ये पोहोचली होती. पण, तिन्हा वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यानंतरही आरसीबीच्या फॅन्सनी त्यांची साथ सोडलेली नाही. याचं कारण आहे टीम इंडियाचा सुपपरस्टार विराट कोहली. 

IPL 2025 Final : RCB चं टेन्शन खल्लास, इंग्लंडहून पहाटे परतला विराटचा सहकारी! बायको नाही टीमला प्राधान्य

( नक्की वाचा :  IPL 2025 Final : RCB चं टेन्शन खल्लास, इंग्लंडहून पहाटे परतला विराटचा सहकारी! बायको नाही टीमला प्राधान्य )

महिलेच्या आयुष्याचे काय होईल? (RCB Divorce Drama)

पंजाबनं आरसीबीविरुद्ध यापूर्वीचा सामना गमावला होता. पण, त्यांची टीमही फॉर्मात आहे. आता पंजाब आरसीबीकडून आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. पंजाबनं त्यांचा बदला पूर्ण केला तर ही महिला खरोखरचं पतीला घटस्फोट देईल का? हिलेने पतीला घटस्फोट दिलाच, तर विचार करा त्या बिचाऱ्या पतीचे काय होईल, ज्याचा या सामन्याशी काहीही संबंध नाही, या प्रश्नांची क्रिकेट फॅन्समध्ये चर्चा सुरु आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com