जाहिरात

IPL 2025 KKR Retentions : आयपीएल विजेत्या कॅप्टनलाच केकेआरनं दाखवला बाहेरचा रस्ता

IPL 2025 KKR Retentions : केकेआरनं आयपीएल विजेता कॅप्टन श्रेयस अय्यरला टीममधून बाहेर केलंय.

IPL 2025 KKR Retentions : आयपीएल विजेत्या कॅप्टनलाच केकेआरनं दाखवला बाहेरचा रस्ता
मुंबई:

IPL 2025 KKR Retentions : आयपीएल 2024 च्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) आागामी आयपीएल ऑक्शनपूर्वी धक्कादायक निर्णय घेतला आहे. केकेआरनं आयपीएल विजेता कॅप्टन श्रेयस अय्यरला टीममधून बाहेर केलंय. केकेआरनं आगामी मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. केकेआरनं आगामी ऑक्शनपूर्वी 6 खेळाडूंना रिटेन केले आहे. पण, त्यामध्ये माजी कॅप्टनचा समावेश नाही. 

केकेआरनं सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, हर्षित राणा आणि रमणदीप सिंह या सहा खेळाडूंना रिटेन केलं आहे. सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्ती यांना केकेआरनं यापूर्वी देखील रिटेन केले होते. त्याचबरोबर मागील आयपीएल विजेतेपदात महत्त्वाची कामगिरी बजावलेला फास्ट बॉलर हर्षित राणा आणि आक्रमक खेळाडू रिंकू सिंह यांनाही केकेआरनं रिटेन केलं आहे. या चार खेळाडूंना रिटेन करण्यासाठी केकेआरनं 57 कोटी खर्च केले आहेत. त्यांच्याकडं आता 51 कोटी रुपये शिल्लक आहेत. 

IPL 2025 RCB Retentions  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून धक्कादायक बातमी, विराटचा जवळचा मित्र बाहेर

( नक्की वाचा : IPL 2025 RCB Retentions रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून धक्कादायक बातमी, विराटचा जवळचा मित्र बाहेर )

कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) रिटेन केलेले खेळाडू आणि त्यांना मिळालेली रक्कम

रिंकू सिंह - 13 कोटी
सुनील नरीन - 12 कोटी
आंद्रे रसेल - 12 कोटी
वरुण चक्रवर्ती - 12 कोटी
हर्षित राणा - 4 कोटी
रमणदीप सिंह - 4 कोटी

केकेआरनं आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वीच सर्व 6 खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडं आता मेगा ऑक्शनमध्ये एकही RTM कार्ड नसेल. त्यांच्याकडील 51 कोटी रुपयांमध्ये उर्वरित टीम तयार करण्याचं आव्हान केकेआरपुढं आहे. 

IPL 2025 Retentions : धोनी आयपीएल खेळणार, 5 दिग्गजांवर CSK चा विश्वास

( नक्की वाचा :  IPL 2025 Retentions : धोनी आयपीएल खेळणार, 5 दिग्गजांवर CSK चा विश्वास )

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिचेल स्टार्कलाही मुक्त करण्याचा निर्णय केकेआरनं घेतलाय. स्टार्कला मागील आयपीएल ऑक्शनमध्ये केकेआरनं 24 कोटी 75 लाखांची विक्रमी बोली लावून खरेदी केलं होतं. स्टार्कची मागील सिझनमधील कामगिरी साधारण होती. त्यानं क्वालिफायर वन मध्ये 34 रन देऊन 3 विकेट्स आणि फायनलमध्ये 14 रन देत 2 विकेट्स घेऊन टीमच्या विजेतेपदात हातभार लावला होता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: