जाहिरात

IPL 2025 Retentions : धोनी आयपीएल खेळणार, 5 दिग्गजांवर CSK चा विश्वास

IPL 2025 Retentions CSK : पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जनं महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) विश्वास कायम ठेवलाय.

IPL 2025 Retentions : धोनी आयपीएल खेळणार, 5 दिग्गजांवर CSK चा विश्वास
IPL 2025 Retentions CSK, MS Dhoni
मुंबई:

IPL 2025 Retentions CSK : आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय टीममध्ये चेन्नई सुपर किंग्जचा समावेश आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जनं महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) विश्वास कायम ठेवलाय. 43 वर्षांच्या धोनीला आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केलं असल्याचं चेन्नई सुपर किंग्जनं जाहीर केलं आहे. आगामी मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्यासाठी बीसीसीआयनं दिलेली अंतिम मुदत संपली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जनं त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

चेन्नई सुपर किंग्जनं महेंद्रसिंह धोनीसह कॅप्टन ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, शिवम दुबे आणि मथीशा पथिराणा या पाच जणांना रिटेन केलं आहे. या पाच जणांना रिटेन करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जनं 65 कोटी रुपये खर्च केले आहेत.  त्यामुळे आता आगामी मेगा ऑक्शनसाठी एकूण 120 कोटींच्या बजेटमधील 55 कोटी रुपये चेन्नई सुपर किंग्जकडं शिल्लक आहेत.

चेन्नई सुपर किंग्जनं रिटेन केलेले खेळाडू आणि त्यांना मिळालेली रक्कम

रविंद्र जडेजा - 18 कोटी
ऋतुराज गायकवाड - 18 कोटी
शिवम दुबे - 12 कोटी
मथीशा पथिराणा - 13 कोटी
महेंद्रसिंह धोनी - 4 कोटी

IPL 2025 Retentions : रोहित शर्माचं ठरलं ! मुंबई इंडियन्सं 5 खेळाडूंना केलं रिटेन, वाचा संपूर्ण यादी

( नक्की वाचा : IPL 2025 Retentions : रोहित शर्माचं ठरलं ! मुंबई इंडियन्सं 5 खेळाडूंना केलं रिटेन, वाचा संपूर्ण यादी )


धोनी अनकॅप खेळाडू का?

टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कॅप्टन्समध्ये महेंद्रसिंह धोनीचा समावेश आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. आयपीएलमध्येही धोनी यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं पाचवेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. मागील सिझनमध्ये धोनीनं कॅप्टनसीचा राजीनामा देऊन ऋतुराज गायकवाडकडं सीएसकेची कॅप्टनसी सोपवली.

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार पाच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूला आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अनकॅप खेळाडू समजलं जाणार आहे. त्यामुळे यंदा महेंद्रसिंह धोनी हा अनकॅप खेळाडू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: