IPL 2025 RCB Retentions रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून धक्कादायक बातमी, विराटचा जवळचा मित्र बाहेर

IPL 2025 RCB Retentions : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) अद्याप एकही आयपीएल विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यानंतरही या टीमची लोकप्रियता मोठी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2025 RCB Retentions (File Photo)
मुंबई:

IPL 2025 RCB Retentions : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) अद्याप एकही आयपीएल विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यानंतरही या टीमची लोकप्रियता मोठी आहे. जागतिक क्रिकेटचा सध्याचा सर्वात मोठा सुपरस्टार विराट कोहली आरसीबीकडून खेळतो. विराटच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा आरसीबीला आजवर झाला आहे. विराटसह एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल हे स्फोटक खेळाडू यापूर्वी आरसीबीचे सदस्य होते. अगदी मागील आयपीएल सिझनमध्येही ग्लेन मॅक्सवेल, फाफ ड्यू प्लेसिस आणि दिनेश कार्तिक या स्टार खेळाडूंचा आरसीबीमध्ये समावेश होता.

RCB चा धक्कादायक निर्णय

आगामी आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2025 Mega Auction) रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी आरसीबीनं सादर केली आहे. या यादीमध्ये अर्थातच विराट कोहली हे पहिलं नाव आहे.  विराटला तब्बल 21 कोटी रुपये खर्च करुन आरसीबीनं रिटेन केलं आहे. पण, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ ड्यू प्लेसिस या प्रमुख खेळाडूंना कायम न करण्याचा निर्णय आरसीबनं घेतला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा जवळचा मित्र समजला जाणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचंही नाव रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये नाही.

( नक्की वाचा : IPL 2025 DC Retentions List : दिल्लीचा राजा बदलणार! ऋषभ पंतची ऑक्शनमध्ये एन्ट्री )

आरसीबीनं विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना रिटेन करण्याचा निर्णय आरसीबीनं घेतला आहे. रजत पाटीदार आणि यश दयाल यांनी आरसीबीकडून मागील सिझनमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यांना भविष्यातील योजनांचा भाग म्हणून आरसीबीनं रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन खेळाडूंना रिटेन करण्यासाठी आरसीबीनं 37 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता त्यांच्याकडं आगामी मेगा ऑक्शनमध्ये खर्च करण्यासाठी 83 कोटी रुपये शिल्लक आहेत. 

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं रिटेन केलेले खेळाडू आणि त्यांना मिळालेली रक्कम

  • विराट कोहली - 21 कोटी
  • रजत पाटीदार - 11 कोटी
  • यश दयाल - 5 कोटी

मोहम्मद सिराजची आयपीएल कारकिर्द

मोहम्मद सिराजनं आत्तापर्यंत 93 आयपीएल मॅचमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 30.35 असून इकोनॉमी रेट 8.65 इतका आहे. 21 रन्स देऊन 4 विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 Retentions : रोहित शर्माचं ठरलं ! मुंबई इंडियन्सं 5 खेळाडूंना केलं रिटेन, वाचा संपूर्ण यादी )