जाहिरात

IPL 2025 LSG Retentions : लखनौमध्ये मोठी उलथापालथ, कॅप्टन बाहेर 'या' खेळाडूला मिळाले 21 कोटी

IPL 2025 LSG Retentions : आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी  लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) टीममध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

IPL 2025 LSG Retentions : लखनौमध्ये मोठी उलथापालथ, कॅप्टन बाहेर 'या' खेळाडूला मिळाले 21 कोटी
Lucknow Super Giants (Photo - BCCI)
मुंबई:

IPL 2025 LSG Retentions : आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी  लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) टीममध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. लखनौनं त्यांचा मागील तीन सिझनमधील कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) बाहेर केलं आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅटर आणि विकेट किपर निकोल पूरनला 21 कोटी रुपये देऊन रिटेन केलं आहे. 

लखनौ सुपर जायंट्सची मागील आयपीएल सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यानंतर टीमचे मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा होती. टीमच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या झहीर खान समितीनंही केएल राहुलच्या संथ खेळाचा टीमला फटका बसल्याचा ठपका ठेवला होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लखनौनं आगामी सिझनसाठी तब्बल 21 कोटी रुपयांना रिटेन केलेले निकोलस पूरन टीमचा कॅप्टन होऊ शकतो. त्याचबरोबर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे दोन आयपीएल कॅप्टन देखील ऑक्शनमध्ये असल्यानं त्यांच्यासाठी लखनौ कितीपर्यंत बोली लावणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

निकोलस पुरनसह लखनौनं आगामी सिझनसाठी मयांक यादव, रवी बिश्नोई, मोहसीन खान आणि आयुष बदोनी यांना रिटेन केलं आहे. या पाच खेळाडूंना रिटेन करण्यासाठी लखनौनं एकूण 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. आगामी आयपीएल सिझनसाठी त्यांना खर्च करण्यास आता 69 कोटी रुपये शिल्लक आहेत.

IPL 2025 : KKR मॅनेजमेंटची मोठी चूक, शाहरुख खानला लागला 12 कोटींचा चुना, तुमच्या लक्षात आलं का?

(  IPL 2025 : KKR मॅनेजमेंटची मोठी चूक, शाहरुख खानला लागला 12 कोटींचा चुना, तुमच्या लक्षात आलं का? )

 लखनौ सुपर जायंट्सनं रिटेन केलेले खेळाडू आणि त्यांना मिळालेली रक्कम

  • निकोलस पूरन - 21 कोटी
  • मयांक यादव - 11 कोटी
  • रवी बिश्नोई - 11 कोटी
  • मोहसीन खान - 4 कोटी
  • आयुष बदोनी - 4 कोटी

बीसीसीआयनं जाहीर केलेल्या नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझीला आगामी सिझनसाठी रिटेन आणि RTM कार्डचा वापर करुन जास्तीत 6 जुन्या खेळाडूंना आपल्याकडं ठेवण्याची संधी आहे. आता लखनौकडं एकच RTM कार्ड शिल्लक आहे. त्यासाठी त्यांच्याकडं मार्कस स्टॉयनिस, क्विंटन डी कॉक , कृणाल पांड्या हे प्रमुख पर्याय आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com