जाहिरात

IPL Records : रियान परागचा धमाका; कोलकाताविरुद्ध स्फोटक खेळी, अनेक विक्रमांना गवसणी

Riyan Parag IPL records : रियान आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू देखील ठरला आहे.

IPL Records : रियान परागचा धमाका; कोलकाताविरुद्ध स्फोटक खेळी, अनेक विक्रमांना गवसणी

IPL 2025 : यंदाचं आयपीएल 2025 सीजन नव्या पीढीच्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने गाजवलं. अभिषेक शर्मा, प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे असे अनेक तरुण खेळाडू यंदा चमकले. यामध्ये तुलनेने अनुभवी मात्र तरुण असलेल्या रियान परागचं नाव देखील येतं. रियान परागने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध स्फोटक फलंदाजी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार लगावून रियानने इतिहास रचला आहे. रियानने सलग 6 षटकार लगावले मात्र ते एकाच षटकात नाही आले. रियानने एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार लगावले नाही, मात्र मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रियान पराग एकमेव उजव्या हाताचा खेळाडू ठरला आहे, ज्याने एकाच षटकात 5 षटकार लगावले आहेत. 

एकाच षटकात 5 षटकार लगावणार 'उजवा' खेळाडू 

याआधी आयपीएलमध्ये 4 खेळाडूंनी एकाच षटकात 5 षटकार ठोकले आहेत. मात्र हे सर्व खेळाडून डावखुरे आहेत. म्हणजेच आयपीएलमध्ये असं पहिल्यांदा घडलं आहे की डावखुरा नसलेल्या खेळाडूने एकाच षटकात 5 षटकार लगावले आहेत. रियान परागच्या आधी, ख्रिस गेल, राहुल तेवतिया, रिंकू सिंह, रविंद्र जाडेजा या खेळाडूंना एकाच षटकात 5 षटकार लगावले आहेत. मात्र आता या विक्रमवीरांच्या यादीत रियान परागच्या नावाचाही समावेश झाला आहे. मात्र रियान पराग या सर्वांमध्ये 'उजवा' ठरला आहे. 

ट्रेंडींग बातमी - KKR vs RR: रियान पराग एकाकी लढला, नाईट रायडर्सकडून राजस्थानचा फक्त 1 रन्सने पराभव

राजस्थानकडून चौथ्या स्थानवर सर्वाधिक धावा

याशिवाय रियान पराग आयपीएलच्या इतिहासातील पहिला कर्णधार आहे, ज्याने सलग सहा षटकार लगावले आहेत. याशिवाय रियान आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू देखील ठरला आहे. रियान 95 धावा करत त्याचाच 2024 मधील 84 धावांचा विक्रम मोडला आहे.

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: आयपीएलचा किंग विराट! कुणालाही जमलं नाही ते करुन दाखवलं, नवा इतिहास रचला

2024 पासून सर्वाधिक षटकारांचा विक्रम

रियान आयपीएलमध्ये 2024 पासून सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत परागने अभिषेक शर्माची बरोबरी केली आहे. अभिषेक शर्माने 2024 पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये 59 षटकार मारले आहेत. निकोलस पूरन 70 षटकारांसह यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com