जाहिरात

RR vs DC : ड्रेसिंग रुममध्ये 'वेपिंग' करणाऱ्या रियान परागचा मैदानात धमाका, विराट कोहलीचा महाविक्रम मोडला

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रियान परागने धडाकेबाज फलंदाजी केली. परागने 50 चेंडूत 90 धावा कुटल्या. परागने त्याच्या इनिंगमध्ये 8 चौकार आणि 5 षटकार ठोकले.

RR vs DC : ड्रेसिंग रुममध्ये 'वेपिंग' करणाऱ्या रियान परागचा मैदानात धमाका, विराट कोहलीचा महाविक्रम मोडला
RR vs DC, Riyan Parag

Riyan Parag record in IPL 2026: दिल्ली विरूद्धच्या सामन्याआधी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचा ड्रेसिंग रूममधील 'वेपिंग'चा व्हिडीओ समोर आला होता.यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर बीसीसीआयने रियान परागवर मॅच फीचं 25 टक्के दंड ठोठावण्यात आला.या व्हायरल व्हिडीओमुळं रियान पराग वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.परंतु, आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रियान परागने धडाकेबाज फलंदाजी केली. परागने 50 चेंडूत 90 धावा कुटल्या. परागने त्याच्या इनिंगमध्ये 8 चौकार आणि 5 षटकार ठोकले. परागने 180 च्या स्ट्राईक रेटने दमदाक अर्धशतक ठोकलं. 

कर्णधार म्हणून रियान परागने रचला इतिहास

रियान परागने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जास्त 90 धावांवर बाद होणारा कर्णधार बनला आहे.परागने अशी कामगिरी करून डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली.वॉर्नर आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 2 वेळा 90 धावांवर बाद झाला आहे. तर परागही आयपीएलमध्ये 90 धावांवर दोन वेळा बाद झाला आहे. विराट कोहली कर्णधार म्हणून एकदा 90 धावांवर बाद झाला आहे. 

नक्की वाचा >> Badlapur News: बदलापूर नगरपरिषदेच्या 'या' अधिकाऱ्याविरोधात गुन्हा, आणखी काही आधिकारी अडकणार, प्रकरण काय?

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा 90 धावा करणारे फलंदाज

2 - रियान (95, 90)
2 - वॉर्नर (92, 91)
1 - कोहली (99)
1 - गायकवाड़ (98)
1 - डु प्लेसिस (96)
1 - रोहित (94)
1 - गंभीर (8)
1 - किशन (91)
1 - गांगुली (91)
1 - राहुल (91)
1 - गिल (90)

नक्की वाचा >> Palghar News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी! एकाच कुटुंबातील 16 जणांसोबत घडलं सर्वात भयंक

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 225 धावा केल्या. रियानने 90,ध्रुव जुरेलने 42 धावांची खेळी केली. शेवटच्या ओव्हर्सच्या टप्प्यात डोनोवर फरेराने 14 चेंडूत 47 धावा कुटल्या. वैभव सूर्यवंशी 4,जैस्वाल 6 धावांवर बाद झाला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com