
Anushka Sharma Reaction On Virat Kohli Retirement: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू विराट कोहलीनं दोन दिवसांपूर्वी (सोमवार 12 मे) निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिज (India vs England Test Series) 20 जूनपासून सुरु होत आहे. या सीरिजपूर्वी विराटनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्यामुळे आता विराट फक्त वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्याच्या काळातील महान क्रिकेटपटू म्हणून विराट ओळखला जातो. भारतासह जगभरात टेस्ट क्रिकेटचा प्रसार आणि त्याचं महत्त्व टिकवून ठेवण्यात विराटचा वाटा महत्त्वाचा आहे. विराटनं या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर साहजिकच सर्वच क्षेत्रातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
विराटनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दोन दिवसांनी त्याची पत्नी अनुष्का शर्मानं या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. 37 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये अनुष्कानं लिहिलं आहे, 'टेस्ट क्रिकेटमध्ये तेच यशस्वी झाले ज्यांच्याकडं सांगण्यासारखी काही गोष्ट होती. मोठी गोष्ट जी कोरड्या, देशातील, विदेशातील प्रत्येक पिचवर लिहिल्यांतरही कधी संपणार नाही. '
विराटनं कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती दिल्यानं अनुष्का शर्मासह पंजाब किंग्जची सहमालकीन प्रीति झिंटा देखील खुश नाही. 'मी टेस्ट क्रिकेट मुख्यत: विराटसाठी पाहत होते, ' असं तिनं म्हंटलं आहे.

तिनं पुढं लिहिलं की, 'खेळाच्या या प्रकारात विराटनं त्याची जिद्द आणि खास अंदाजामुळे रंग भरले होते. आता टेस्ट क्रिकेट पूर्वीसारखे असेल असं मला वाटत नाही. मी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देते. आपल्या सध्याच्या खेळाडूंना विराट, रोहित आणि अश्विनची जागा घ्यावी लागेल. कारण ते आता टेस्ट क्रिकेटपासून दूर झाले आहेत.'
( नक्की वाचा : India Tour of England : शुबमन गिल नाही तर 'या' खेळाडूला टीम इंडियाचा कॅप्टन करा, गावस्करांचा सल्ला )
विराटची टेस्ट कारकिर्द
विराट कोहलीनं 2011 ते 2025 दरम्यान 123 टेस्टमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानं यामधील 210 इनिंगमध्ये 46.85 च्या सरासरीनं 9231 रन काढले. विराटच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 30 सेंच्युरी आणि 31 हाफ सेंच्युरींची नोंद आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा तो चौथा भारतीय आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world