Virat Kohli : विराट कोहलीनं 5 सेकंदामध्ये दिलं सर्वात मोठं अपडेट, फॅन्समध्ये जोरदार चर्चा! Video

Virat Kohli : आयपीएल 2025 मधील पुढील सामन्यांसाठी सज्ज होत असताना विराट कोहलीनं एक महत्त्वाची बातमी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट टीममधील सर्व प्रमुख खेळाडू सध्या आयपीएलमध्ये (IPL 2025) व्यस्त आहेत. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) कडून खेळतोय. आरसीबीनं या स्पर्धेची सुरुवात चांगली केलीय. पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला. आता पुढील सामन्यांसाठी सज्ज होत असताना विराटनं एक महत्त्वाची बातमी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला विराट?

विराट कोहलीनं एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्याच्या निवृत्तीबाबत महत्त्वाची बातमी दिली. टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होणार अशी चर्चा होती. त्यावर आपण सध्या कुठंही जाणार नसल्याचं रोहित शर्मानं स्पष्ट केलं होतं. रोहितनंतर आता विराटनंही त्याच्या निवृत्तीबाबत खुलासा केला आहे.

( नक्की वाचा : IPL 2025 : भन्नाट कॅच, पहिल्याच बॉलवर विकेट! कोण आहे मुंबईचा नवा स्टार Ashwani Kumar? )
 

वर्तमानाचा विचार करता तुझ्या पुढच्या वाटचालीबाबत काय संकेत देशील? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता. त्यावर मला माहिती नाही, कदाचित 2027 मध्ये होणारा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करेन, असं विराटनं सांगितलं. या उत्तरासह विराटनं तो इतक्यात निवृत्त होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराटनं या आयपीएल सिझनमध्ये आत्तापर्यंत 2 मॅचमध्ये 90 रन्स केले आहेत. आरसीबीनं पहिल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सनं पराभव केला होता. त्या मॅचमध्ये विराटनं 36 बॉलमध्ये 59 रन्स काढले. तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं 31 रन्सची खेळी केली होती. 

Advertisement
Topics mentioned in this article