IPL 2026, LSG vs SRH: आयपीएल 2026 च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) आपला पहिला विजय नोंदवला. पण या विजयापेक्षा जास्त चर्चा आवेश खानच्या एका व्हायरल व्हिडिओची होत आहे. ऋषभ पंतने मारलेल्या विजयी शॉटवर आवेश खानने मैदानाबाहेरून केलेली कृती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, हैदराबादला विजयाची संधी होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
सामन्याच्या शेवटच्या षटकात ऋषभ पंतने विनिंग बाऊंड्री मारली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना डगआऊटमध्ये उभा असलेल्या आवेश खानने तो चेंडू आपल्या बॅटने मारून पुन्हा मैदानात पाठवून दिला. अर्शिन कुलकर्णी आणि इतर खेळाडूंनी यावर आश्चर्य व्यक्त केले. चेंडू सीमारेषेला स्पर्श करण्यापूर्वीच आवेशने त्याला स्पर्श केल्याने ही 'डेड बॉल' किंवा 'अनफेअर प्ले'ची स्थिती होती का, यावर चर्चा सुरू झाली.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Viral Video : "अंकल वाचवा, अंकल सोडवा..." पेरू तोडल्याची चिमुकलीला भयंकर शिक्षा, माजी सैनिकाला बेड्या सोशल मीडियावर अनेक चाहत्यांचा दावा आहे की, आयसीसीच्या नुसार, जर मैदानाबाहेरील खेळाडूने खेळात हस्तक्षेप केला, तर प्रतिस्पर्धी संघाला 5 पेनल्टी रन्स दिले जाऊ शकते. जर SRH ने त्याक्षणी अंपायरकडे अधिकृत अपील केली असती, तर अंपायर हा हस्तक्षेप 'अनुचित' ठरवू शकले असते. 5 धावांची पेनल्टी लागली असती तर लखनऊला शेवटच्या 2 चेंडूंवर 1 धाव नाही, तर 6 धावा हव्या असत्या. जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर हे लक्ष्य गाठणे कठीण जाऊ शकले असते. नियम 19 (बाऊंड्री): जेव्हा चेंडू पहिल्यांदा सीमारेषेला किंवा त्यापुढील जमिनीला स्पर्श करतो, तेव्हा तो 'डेड' मानला जातो. आवेशच्या प्रकरणात चेंडू सीमारेषा पार करणार हे निश्चित होते, त्यामुळे अंपायरनी त्याकडे दुर्लक्ष केले. नियम 20.1 (डेड बॉल): आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, जर बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप केला तर तो चेंडू 'डेड बॉल' घोषित केला जाऊ शकतो. मात्र, आवेश हा संघाचाच भाग असल्याने हे 'अनफेअर प्ले'च्या कक्षेत येऊ शकले असते. (नक्की वाचा- Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO) तांत्रिकदृष्ट्या, जर अंपायरने 5 धावांची पेनल्टी दिली असती, तर सामन्याचा निकाल बदलू शकला असता. मात्र, आवेश खानचा हेतू कोणाला फसवण्याचा किंवा रन रोखण्याचा नव्हता, तर तो केवळ विजयाचा जल्लोष होता. त्यामुळे अशा प्रकरणांत सहसा दंड लावला जात नाही. मात्र, हैदराबादने अपील न केल्यामुळे ही संधी त्यांच्या हातातून निसटली.5 धावांची पेनल्टी लागली असती का?
काय सांगतो नियम 19 आणि 20.1?
लखनऊचा पराभव झाला असता का?