IPL 19: खेळाडूंच्या 'मनमर्जी'ला लगाम! BCCI कडून नियमात मोठे बदल; उल्लंघन केल्यास दंडही

IPL 2026 साठी BCCI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. खेळाडूंना आता वैयक्तिक वाहनांनी स्टेडियमवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण समारंभासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 19 New Rules : आयपीएलचा 19 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझी मॅनेजर्सना नवीन नियमावली पाठवली आहे. IPL 2026 हंगामासाठी खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी अत्यंत कडक नियमावली (SOP) जारी केली आहे. विशेषतः ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना आता मैदानावरील त्यांच्या 'फ्रीडम' आणि 'स्टाईल'वर बीसीसीआयने लावलेल्या या नव्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये नेट प्रॅक्टिसपासून ते सामन्याच्या दिवसापर्यंतच्या प्रत्येक हालचालीवर बोर्डाने लक्ष केंद्रित केले आहे.

नेट प्रॅक्टिस आणि सरावाचे नवे नियम

  • आता खेळाडूंना उघड्यावर (Open Net) सराव करण्याची परवानगी नसेल.
  • एका टीमचा सराव लवकर संपला तरी दुसरी टीम त्याच खेळपट्टीवर सराव करू शकणार नाही.
  • खेळाडूंना अनिवार्यपणे टीम बसनेच स्टेडियमवर यावे लागेल. आता कोणत्याही खेळाडूला त्याच्या खाजगी आलिशान कारने मैदानात येता येणार नाही.
  • खेळाडूंचे कुटुंबीय किंवा मित्र त्यांच्यासोबत प्रवास करू शकणार नाहीत. त्यांना दुसऱ्या वाहनाने येऊन 'हॉस्पिटॅलिटी एरिया'तून सराव पाहावा लागेल.

(नक्की वाचा-  Pune News: अंडरग्राउंट मेट्रोच्या वर बोअर मारल्याचा प्रकार; महामेट्रोचं मोठं नुकसान, गुन्हा दाखल)

सामन्याच्या दिवशी पाळावयाचे नियम

  • खेळाडूंना बाउंड्रीवरील LED बोर्डवर शॉट मारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सपोर्ट स्टाफला या बोर्डसमोर बसता येणार नाही.
  • पाणी किंवा टॉवेल घेऊन बाउंड्रीवर बसणाऱ्या खेळाडूंसाठी प्रायोजकांनी 'चिन्हांकित' केलेली जागाच वापरावी लागेल.
  • ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्यांना ती कॅप घालणे बंधनकारक असेल. किमान दोन ओव्हर तरी ती कॅप घालावी लागेल जेणेकरून ब्रॉडकास्टर्सना ते कॅमेऱ्यात टिपता येईल.

सामन्यानंतरचा 'ड्रेस कोड' आणि दंड

बीसीसीआयने सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी कडक पावले उचलली आहेत. खेळाडूंना आता प्रेझेंटेशन सेरेमनीला स्लीवलेस जर्सी किंवा स्लीपर्स घालून येता येणार नाही. नियमाचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास चेतावणी दिली जाईल, तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास मोठा आर्थिक दंड आकारला जाईल.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: भोंदूबाबा खरातचा नवा कारनामा! करिअर घडवण्याच्या नावाने तरुणीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त )

ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्यासारखे खेळाडू अनेकदा त्यांच्या वैयक्तिक प्रवासासाठी आणि फॅशनसाठी चर्चेत असतात. मात्र, बीसीसीआयच्या या नव्या 'शिस्त' धोरणामुळे या खेळाडूंना आता संघ व्यवस्थापनाच्या चौकटीत राहूनच वागावे लागणार आहे.
 

Topics mentioned in this article