जाहिरात

IPL 2026 Points Table: चेन्नईच्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर! कोलकाताची प्लेऑफची वाट बिकट

चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 32 धावांनी पराभव करत आपला दुसरा विजय नोंदवला आहे. या पराभवामुळे केकेआर गुणतालिकेत 10 व्या क्रमांकावर फेकली गेली.

IPL 2026 Points Table: चेन्नईच्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर! कोलकाताची प्लेऑफची वाट बिकट

IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) केकेआरचा 32 धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 8 व्या स्थानावर झेप घेतली. केकेआरसाठी मात्र धोक्याची घंटा वाजली आहे. 5 सामन्यांत 4 पराभव पत्करावा लागलेली केकेआर आता गुणतालिकेत सर्वात शेवटच्या, म्हणजेच 10 व्या स्थानी पोहोचली आहे.

प्लेऑफसाठी केकेआरला आता 'करो या मरो'ची स्थिती

केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का बसला, तर पंजाबविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना केवळ 1 गुण मिळाला आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी साधारणपणे 14 ते 16 गुणांची आवश्यकता असते. केकेआरला आता आपल्या उर्वरित 9 सामन्यांपैकी किमान 7 ते 8 सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील.

IPL Point Table

IPL Point Table

नेट रन रेटचे मोठे टेन्शन 

केकेआरसाठी केवळ विजय पुरेसा नाही, तर त्यांना आपला -1.315 असलेला खराब 'नेट रन रेट' देखील सुधारावा लागणार आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात जर दोन संघांचे गुण समान झाले, तर हा रन रेट केकेआरसाठी अडथळा ठरू शकतो.

सीएसकेची गुणतालिकेत झेप

दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने या विजयासह आपली स्थिती सुधारली आहे. 5 सामन्यांत 2 विजयांसह 4 गुण मिळवत धोनीचा संघ आता 8 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात केकेआरला चारीमुंड्या चित केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com