IPL 2026 PBKS vs GT : आयपीएल 2026 मधील चौथी लढत पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स (Punjab Kings vs Gujarat Titans) यांच्यात झाली. दोन्ही टीमची या सिझनमधील ही पहिलीच लढत होती. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेला हा सामना पंजाबनं 3 विकेट्सनं जिंकला.
गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करत 163 रन्सचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाबनं 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. तो 7 रन काढून आऊट झाला. त्यानंतर प्रबसिमरन सिंह आणि कुपर कोनलीनं पंजाबची इनिंग सावरली.
रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरनं कोनलीवर मोठा विश्वास दाखवला आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करत असलेल्या ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरला त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली. त्यानं मॅनेजमेंटचा हा विश्वास सार्थ ठरवत आश्वासक सुरुवात केली.
तर दुसरिकडं आयपीएल 2025 फायनलनंतर पहिलीच T20 मॅच खेळत असलेल्या श्रेयसनंही आक्रमक सुरुवात केली. श्रेयस अय्यर तब्बल 301 दिवसांनी श्रेयस T20 मॅच खेळत होता. पण, त्याचा कोणताही परिणाम त्याच्या खेळावर जाणवत नव्हता. पण,कोनलीच्या चुकीमुळे श्रेयसची एकाग्रता बिघडली आणि तो आऊट झाला.
नेमकं काय घडलं?
गुजरातकडून राशिद खान 12 वी ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरचा पाचवा बॉल कॉनलीनं जोरात टोलावला. पण, तो थेट श्रेयसच्या उजव्या हाताच्या ग्लोजला लागला. हा फटका इतका वेगवान होता की श्रेयसला वेदना असह्य होत होत्या.
पंजाबच्या फिजिओनं श्रेयसवर उपचार केले. त्यानंतर तो बॅटिंगला आला. पण, त्याची एकाग्रता भंग झाली होती. तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला. प्रसिद्ध कृष्णानं त्याला आऊट केलं.
श्रेयस अय्यर आऊट झाल्यानंतर पंजाबची इनिंग गडगडली. 2 आऊट 110 नंतर 6 आऊट 118 अशी पंजाबची अवस्था झाली होती. पंजाबची मिडल ऑर्डर अचानक कोसळली. पण कोनलीनं हाफ सेंच्युरी झळकावत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोनलीनं सामना जिंकून दिला असला तरी काही काळ त्यांनं पंजाबच्या फॅन्सच्या पोटात गोळा आणला होता. पंजाबसाठी सहज वाटणारा सामना कोनलीनं अवघड केला.
( नक्की वाचा : IPL 2026: मॅच संपवून परतले अन् पुन्हा उठलेच नाहीत! BCCI च्या अधिकाऱ्याचा मुंबईच्या हॉटेलमध्ये धक्कादायक मृत्यू )
गुजरातला मोठा स्कोअर करण्यात अपयश
पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. साई सुदर्शन आणि शुबमन गिल ही गुजरातची ओपनिंग जोडी गेल्या सिझनमध्ये यशस्वी ठरली होती. पहिल्या मॅचमध्ये मोठी पार्टरनशिप करण्यात त्यांना अपयश आलं.
साई सुदर्शन 13 रन काढून आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन गिलनं अनुभवी जोस बटलरसोबत गुजरातची इनिंग सावरली. पण ते दोघेही सेट झाल्यानंतर आऊट झाले. गिल 39 तर बटलर 38 रन काढून आऊट झाले.
गुजरातच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडल्यानं त्यांना मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. गुजरातनं पहिल्या इनिंगमध्ये 6 आऊट 162 रन केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world