IPL 2026 RCB vs MI : आयपीएल 2026 ला बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर दमदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला.
गतविजेत्या आरसीबीनं घरच्या मैदानावर मोठ्या संख्येनं जमलेल्या फॅन्सना निराश केलं नाही. त्यांनी सनरायझर्स हैदराबादला 6 विकेट्सनं पराभूत केलं. देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदारची आक्रमक बॅटिंग आणि अनुभवी विराट कोहलीची पहिल्याच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी हे आरसीबीच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
The elegance and wrist game of Virat Kohli. 🤤pic.twitter.com/np8i5OjZht
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 28, 2026
सनरायझर्स हैदराबादनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 आऊट 201 रन्स केले. सॉल्ट आऊट झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलनं वादळी बॅटिंग केली. त्यानं फक्त 26 बॉलमध्ये 61 रन्स काढले. देवदत्तनं या खेळीत 7 फोर आणि 4 सिक्स लगावले.
सॉल्ट आऊट झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलनं वादळी बॅटिंग केली. त्यानं फक्त 26 बॉलमध्ये 61 रन्स काढले. देवदत्तनं या खेळीत 7 फोर आणि 4 सिक्स काढले.
आरसीबीचा कॅप्टन रजत पाटिदारनंही आक्रमक बॅटिंग करत 12 बॉलमध्ये 31 रन केले. तर विकेट किपर जितेश शर्माला भोपळाही फोडता आला नाही. या दोघांनाही जयदेव उनाडकतनं आऊट केलं.
कशी झाली SRH ची बॅटिंग?
यापूर्वी सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाचा T20 स्टार अभिषेक शर्मा (7) आणि ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ओपनर ट्रॅव्हिस हेड (11) झटपट आऊट झाले. ऑल राऊंडर नितीश कुमार रेड्डी (1) देखील अपयशी ठरला. आरसीबीच्या जेकब डफीनं पॉवर प्लेमध्येच या तिघांना आऊट केले.
THE ARRIVAL OF JACOB DUFFY IN THE IPL. pic.twitter.com/9lQtGNUrql
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 28, 2026
सध्या फॉर्मात असलेल्या इशान किशननं हैदराबादला सावरले. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमध्ये इशान टीमचं नेतृत्त्व करतोय. त्यानं आयपीएल कॅप्टन म्हणून पहिल्याच मॅचमध्ये दमदार बॅटिंग केली.
( नक्की वाचा : Shane Warne: शेन वॉर्न निघाला खरा 'धुरंधर'; 18 वर्षांपूर्वीच्या एका अटीमुळे कुटुंबावर 460 कोटींचा धनवर्षाव )
इशान किशननं फक्त 38 बॉलमध्ये 8 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 80 रन्स केले. इशान किशननं हेनरिक क्लासेनसोबत चौथ्या विकेटसाठी 97 रन्सची पार्टनरशिप केली.
इशान किशन सेंच्युरी पूर्ण करेल असं वाटत होतं. पण फिल सॉल्टनं एक अप्रतिम कॅच घेत त्याची खेळी संपुष्टात आणली.
𝐒𝐓𝐎𝐏 𝐖𝐇𝐀𝐓 𝐘𝐎𝐔 𝐀𝐑𝐄 𝐃𝐎𝐈𝐍𝐆 𝐀𝐍𝐃 𝐖𝐀𝐓𝐂𝐇 𝐓𝐇𝐈𝐒! 🛑
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
🎥 Phil Salt with an absolute one-handed screamer at the ropes 🫡
Do we already have the Catch of the Season on Day 1 of #TATAIPL 2026 🤔
Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #KhelBindaas | #RCBvSRH |… pic.twitter.com/pPax3pVNt9
अंकित वर्मानं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 18 बॉलमध्ये 43 रन्स काढले. या खेळीत अंकितनं 3 फोर आणि 4 सिक्स लगावले. अंकितच्या फटकेबाजीमुळेच सनरायझर्स हैदराबादला 200 चा टप्पा ओलांडता आला.
आरसीबीकडून टफी आणि रोमारियो शेपर्ड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world