जाहिरात

Shane Warne: शेन वॉर्न निघाला खरा 'धुरंधर'; 18 वर्षांपूर्वीच्या एका अटीमुळे कुटुंबावर 460 कोटींचा धनवर्षाव

Rajasthan Royals Sale 2026: शेन वॉर्न आज आपल्यात नसला तरी, त्याने सुमारे 18 वर्षांपूर्वी लावलेल्या एका दूरदृष्टीच्या 'डावा'मुळे आता त्याच्या कुटुंबावर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Shane Warne:  शेन वॉर्न निघाला खरा 'धुरंधर'; 18 वर्षांपूर्वीच्या एका अटीमुळे कुटुंबावर 460 कोटींचा धनवर्षाव
Shane Warne : शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन बनण्यासाठी एक विशेष अट घातली होती.
मुंबई:

Rajasthan Royals Sale 2026: मैदानावर फिरकीच्या जादुने बॅटर्सना नाचवणारा ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्न हा केवळ क्रिकेटचाच नाही, तर गणिताचाही पक्का खिलाडी होता, हे आता सिद्ध झाले आहे. शेन वॉर्न आज आपल्यात नसला तरी, त्याने सुमारे 18 वर्षांपूर्वी लावलेल्या एका दूरदृष्टीच्या 'डावा'मुळे आता त्याच्या कुटुंबावर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स ही टीम विकली गेल्याने वॉर्नच्या वारसांना तब्बल 450 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळणार आहे. एका खेळाडूने खेळता खेळता आपल्या कुटुंबाचे भविष्य कसे सुरक्षित केले. हे नेमकं कसं झालं? शेन वॉर्ननं कसं डोकं चालवलं होतं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राजस्थान रॉयल्स या टीमची मालकी आता बदलली असून, अमेरिकेतील एका समूहाने ही टीम तब्बल 15,290 कोटी रुपयांना (1.63 अब्ज डॉलर्स) खरेदी केली आहे. या अवाढव्य व्यवहारामुळे शेन वॉर्नच्या करारातील एक गुप्त अट आता चर्चेत आली आहे. 2008 मध्ये जेव्हा आयपीएलचे पहिले सीजन सुरू झाले, तेव्हा वॉर्नने राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन बनण्यासाठी एक विशेष अट घातली होती, जिचा फायदा आता दोन दशकांनंतर त्याच्या मुलांना मिळणार आहे.


( नक्की वाचा : IPL 2026: कितीही पैसे मोजा, स्टेडियम बुक करा, पण 'या' 11 सीट्स कुणालाच मिळणार नाहीत! आयपीएल टीमचा मोठा निर्णय )

काय होती शेन वॉर्नची अट?

शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्ससाठी 4 सीजन खेळले आणि त्यासाठी त्याने सुमारे 9.35 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. मात्र, खरा ट्विस्ट त्याच्या पगारात नव्हता, तर त्याने घेतलेल्या 'इक्विटी'मध्ये होता. निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात परतण्यासाठी वॉर्नने अट ठेवली होती की, तो जोपर्यंत या टीमसाठी खेळेल, तोपर्यंत दरवर्षी त्याला टीममधील 0.75% मालकी हक्क (इक्विटी) दिले जातील. वॉर्नने सलग 4 सीजन खेळल्यामुळे राजस्थान रॉयल्समध्ये त्याचा एकूण हिस्सा 3% झाला होता.

 आता 460 कोटी रुपये

आज जेव्हा राजस्थान रॉयल्सची 15,301 कोटी रुपयांना विक्री झाली आहे, तेव्हा वॉर्नचा तो 3% हिस्सा तब्बल 460 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ज्या वेळी 2008 मध्ये मनोज बदाले यांच्या 'इमर्जिंग मीडिया'ने ही टीम अवघ्या 6.7 कोटी डॉलर्समध्ये खरेदी केली होती, तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की भविष्यात तिची किंमत एवढी वाढेल. मात्र, वॉर्नने तेव्हाच या टीमच्या भविष्यातील मूल्याचा अंदाज बांधला होता.

( नक्की वाचा : Anaya Bangar:'वेळ लागला पण.' ऑपरेशननंतर अनाया बांगरची वडिलांसाठी भावूक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याचा नवा प्रवास )
 

कुटुंबाला कधी मिळणार हे पैसे?

शेन वॉर्नचे 2022 मध्ये निधन झाले, मात्र त्याने पेरलेल्या या गुंतवणुकीचे फळ आता त्याच्या मुलांना मिळणार आहे. आयपीएलचे 2026 चे सीजन संपल्यानंतर वॉर्नचे कुटुंब आपला हा हिस्सा विकून ही मोठी रक्कम मिळवू शकणार आहे. अर्थात, या संपूर्ण व्यवहाराला बीसीसीआयची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. शेन वॉर्नने केवळ 2008 मध्ये त्याच्या कॅप्टनसीमध्ये राजस्थानला चॅम्पियन बनवले नव्हते, तर आर्थिक गणितातही त्याने  कुटुंबाला 'विजेते' बनवले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com