जाहिरात

Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल (IPL) 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास घडवणारा 15 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याला ‘सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!

आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या वादळी फलंदाजीने जगभरातील क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेणारा 15 वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या मोसमातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला आयपीएल 2026 चा अधिकृत 'सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन' म्हणून निवडण्यात आले आहे. या बहुमानासोबतच आयपीएल प्रशासनाकडून त्याला तब्बल 25 लाख रुपयांची टाटा सिएरा कार भेट म्हणून देण्यात आली आहे.

परंतु, इतकी महागडी आणि आलिशान कार पदरात पडल्यानंतरही वैभव सूर्यवंशी चाहूनही ही कार स्वतः चालवू शकणार नाही. 

कायदेशीर नियमांचा अडथळा

वैभव सूर्यवंशीचे वय सध्या फक्त 15 वर्षे आहे. भारताच्या मोटार वाहन कायद्यानुसार, भारतात कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते, जे केवळ वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळते. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवणे हा भारतात कायदेशीर गुन्हा मानला जातो.

(नक्की वाचा-  Riyan Angry on V. Sooryavanshi: 96 धावा करणाऱ्या वैभवला रियानने झापलं? RR चा कर्णधार ट्रोलर्सच्या निशाण्यावर)

त्यामुळेच, मैदानावर जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा हा स्टार फलंदाज कायदेशीर नियमांमुळे आपल्याच नवीन कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसू शकणार नाही. ही कार स्वतः चालवण्यासाठी त्याला वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच आणखी 3 वर्षांची प्रदीर्घ वाट पाहावी लागणार आहे.

आयपीएल 2026 मधील वैभव सूर्यवंशीची आकडेवारी

यंदाच्या संपूर्ण हंगामात वैभवने ज्या कमालीच्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या, त्याच बळावर त्याने हा 'सुपर स्ट्राइकर'चा पुरस्कार पटकावला आहे.

  • एकूण सामने: 16 सामने
  • एकूण धावा: 776 धावा
  • स्ट्राईक रेट (SR): 237.30
  • सर्वोच्च धावसंख्या: 103 धावा
  • शतक/अर्धशतके: 1 शतक आणि 5 अर्धशतके
  • एकूण चौकार / षटकार: 63 चौकार आणि 72 गगनचुंबी षटकार

(नक्की वाचा-  ​IPL 2026 Awards: अलिशान कार अन् पैशांचा पाऊस! वैभव सुर्यवंशी झाला मालामाल, मिळाले सर्वाधिक पुरस्कार)

अवघ्या 15 व्या वर्षी आयपीएलमध्ये 72 षटकार मारण्याचा आणि 237 च्या स्ट्राईक रेटने 776 धावा करण्याचा पराक्रम करणाऱ्या वैभवच्या घरात आता टाटा सिएरा कार दिसेल, पण ती चालवण्यासाठी सध्या त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाच स्टेअरिंग हाती घ्यावे लागेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com