जाहिरात

​IPL 2026 Awards: अलिशान कार अन् पैशांचा पाऊस! वैभव सुर्यवंशी झाला मालामाल, मिळाले सर्वाधिक पुरस्कार

वैभवला मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम पाहात सर्वच जण आवाक होतील. ऐवढ्या लहान वयात त्याने केलेला कारनामा मोठा आहे.

​IPL 2026 Awards: अलिशान कार अन् पैशांचा पाऊस! वैभव सुर्यवंशी झाला मालामाल, मिळाले सर्वाधिक पुरस्कार
  • आयपीएल 2026 चा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत केला
  • विराट कोहलीने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावा करत प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळविला
  • १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये ५ पुरस्कार जिंकून सर्वाधिक मान मिळविला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Full List Of Award Winners In IPL 2026: आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 42 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी करत इतिहास रचला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी विराट कोहलीला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. विजेता संघ आरसीबीला 20 कोटी रुपये, तर उपविजेता ठरलेल्या शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला 12.50 कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह मिळाले. पण सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते 15 वर्षांच्या वैभव सुर्यवंशीने. त्याने या आयपीएलमध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकले. या पुरस्कारांची रक्कम पाहाता तो ऐवढ्या लहान वयात मालामाल झाला. 

नक्की वाचा - Vaibhav Suryavanshi: ​वैभव सूर्यवंशीने कसोटी क्रिकेट खेळावे का? सचिन तेंडुलकरने मांडले स्पष्ट मत

या वेळची खरी महफील राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने लूटली. त्याने दिग्गज विराट कोहलीलाही मागे टाकत तब्बल 5 पुरस्कारांवर आपले नाव कोरले. वैभवने या मोसमात 16 सामन्यांत 237.31 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने 776 धावा केल्या. तोच या आयपीएलच्या 'ऑरेंज कैप' चा मानकरी ठरला. याशिवाय त्याला 'मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर' (MVP) सह एकूण 5 पुरस्कार आणि एक टाटा सिएरा कार भेट मिळाली. त्याला मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम पाहात सर्वच जण आवाक होतील. ऐवढ्या लहान वयात त्याने केलेला कारनामा मोठा आहे. 

आयपीएल 2026 पुरस्कारांची संपूर्ण यादी:

  1. विजेता: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (20 कोटी रुपये)
  2. ​उपविजेता: गुजरात टायटन्स (12.50 कोटी रुपये)
  3. ​प्लेयर ऑफ द मॅच: विराट कोहली (10 लाख रुपये)
  4. ​ऑरेंज कॅप: वैभव सूर्यवंशी (776 धावा, 10 लाख रुपये)
  5. ​पर्पल कॅप: कागिसो रबाडा (29 विकेट्स, 10 लाख रुपये)
  6. ​इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन: वैभव सूर्यवंशी (10 लाख रुपये)
  7. ​सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन: वैभव सूर्यवंशी (237.3 स्ट्राईक रेट, 10 लाख रुपये)
  8. ​सुपर सिक्सर ऑफ द सीजन: वैभव सूर्यवंशी (72 षटकार, 10 लाख रुपये)
  9. ​मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर (MVP): वैभव सूर्यवंशी (436.5 पॉइंट्स, 15 लाख रुपये)
  10. ​मोस्ट फोर्स ऑफ द सीजन: साई सुदर्शन (75 चौकार, 10 लाख रुपये)
  11. ​डॉट बॉल्स ऑफ द सीजन: मोहम्मद सिराज (172 डॉट बॉल्स, 10 लाख रुपये)
  12. ​कॅच ऑफ द सीजन: मनीष पांडे (10 लाख रुपये)
  13. ​फेअर प्ले अवॉर्ड: पंजाब किंग्स (10 लाख रुपये)
  14. ​बेस्ट पिच आणि ग्राउंड: क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (50 लाख रुपये) / हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (25 लाख रुपये)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com