बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत बुमराहने 400 विकेट्सचा पल्ला गाठला आहे. भारताकडून 400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा बुमराह सहावा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुमराहच्या आधी कपिल देव, झहीर खान, जवागल श्रीनाथ, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या जलद गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतले आहेत. याशिवाय बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीने 400 बळी घेणारा जागतिक क्रिकेटमधील दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने यामध्ये ग्लेन मॅकग्रा, ॲलन बॉर्डर आणि सर रिचर्ड हॅडलीसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.
(नक्की वाचा - Ashwin: घरच्या मैदनावर अश्विननं घडवला इतिहास, 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू)
400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारे भारतीय जलद गोलंदाज
- कपिल देव - 687
- झहीर खान - 597
- जवागल श्रीनाथ - 551
- मोहम्मद शमी - 448
- इशांत शर्मा - 434
- जसप्रीत बुमराह - 400*
बुमराहच्या कारकिर्दीचे महत्वाचे टप्पे
जसप्रीत बुमराहला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिली विकेट स्टीव्ह स्मिथच्या रूपाने मिळाली. त्यानंतर त्याने 50 विकेट मोईन अलीच्या रूपाने घेतली. एबी डिव्हिलियर्सला बाद करून त्यांने आपलं विकेट्सचं शतक साजरं केलं. 150वी विकेट शिमरॉन हेटमायरची होती. त्यानंतर दिमुथ करुणारत्नेला बाद करून 200वी विकेट पूर्ण केली. निरोशन डिकवेला हा बुमराहचा 300 वा विकेट ठरला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहने हसन महमूदच्या रूपाने 400वी विकेट घेतली आहे.
( नक्की वाचा : IND vs BAN : 'मला का मारतोय' ऋषभ पंत - लिटन दास भर मैदानात भिडले, पाहा Video )
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा बुमराह हा 10 वा भारतीय गोलंदाज आहे. सध्याच्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विनच्या नावावर सर्वाधिक 744 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. तर रवींद्र जडेजानेही सर्व फॉरमॅटमध्ये 570 विकेट्स घेतल्या आहेत.