'कॅप्टन म्हणून बॉलर योग्य, कारण...' बुमराहनं सांगितली 'मन की बात'

Jasprit Bumrah on  captaincy : जसप्रीत बुमराहनं कॅप्टन म्हणून बॉलर्स अधिक योग्य का असतात याचं कारण सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jasprit Bumrah (Photo AFP)
मुंबई:

Jasprit Bumrah on  captaincy : टीम इंडियाच्या 'ऑल टाईम ग्रेट' बॉलर्सची यादी जसप्रीत बुमराहशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बुमराह गेल्या काही वर्षांमध्ये सर्व प्रकारातील भारताचा प्रमुख बॉलर आहे. परदेशातील टेस्ट वा T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद टीम इंडियाच्या सर्व मोठ्या यशामध्ये बुमराहची कामगिरी महत्त्वाची आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये त्यानं टीमची कॅप्टनसी देखील सांभाळली आहे. रोहित शर्मा T20 क्रिकेटमधून निवृत्त झालाय. त्यानंतर हुशार क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहचा कॅप्टन म्हणून विचार झाला नाही. 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बुमराहनं कॅप्टनसीबाबतची त्याची मतं व्यक्त केली आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बुमराहची 'मन की बात'

'मी मला कॅप्टन करा असं टीमला सांगू शकत नाही. मला तितकी पॉवर नाही. ते माझ्या अधिकाराच्या पलिकडं आहे. पण, होय बॉलर्स हे अधिक स्मार्ट असतात असं मला वाटतं कारण त्यांना बॅटर्सना आऊट करावं लागतं. बॉलर्सना कठोर परिश्रम करावे लागतात. त्यांना बॅटच्या मागे किंवा फ्लॅट विकेटच्या मागं लपता येत नाही. आम्ही नेहमीच टार्गेटवर असतो. मॅच गमावल्यानंतर बॉलर्सवर त्याचे खापर फोडले जाते. हा एकूणच खडतर जॉब आहे.

( नक्की वाचा : गौतम गंभीरची मागणी पूर्ण, 'हा' दिग्गज झाला टीम इंडियाचा बॉलिंग कोच )
 

यश मिळवण्यासाठी बॉलर्सना वेगवेगळे प्रकार शोधावे लागतात. त्यामुळे ते धाडसी बनतात.  नेतृत्त्व करण्यासाठी तुम्ही धाडसी असणे आवश्यक आहे. आपण पॅट कमिन्सला कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी करताना पाहिलं आहे. मी लहान होतो त्यावेळी वासिम अक्रम आणि वकार युनूस कॅप्टन होते. कपिल देवच्या कॅप्टनसीमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला. इम्रान खाननं पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यामुळे बॉलर्स हे अधिक हुशार असतात,' असं बुमराहनं सांगितलं.

मी क्रिकेटपटू व्हायचं आहे हे ठरवलं होतं. पण माझ्या घरात स्पोर्ट्स बॅक ग्राऊंडचं कुणीही नाही. माझे काका कॅनडात राहतात. माझ्या आईनं मला क्रिकेटमध्ये भवितव्य आजमवण्यसाठी काही वर्ष दिली होती. अन्यथा मला कॅनडामध्ये नोकरी करण्यासाठी आणि तिथंच स्थायिक होण्यासाठी जावं लागणार होतं. या वर्ल्ड कपमध्ये मी कॅनडाच्या टीमला भेटलो. त्यावेळी ते विनोदानं 'तू इकडं आला असतास तर आपण वर्ल्ड कप एकत्र खेळलो असतो असं म्हणाले.' 

( नक्की वाचा : टीम इंडियाचा आधारस्तंभ जसप्रीत बुमराह करत होता कॅनडात स्थायिक होण्याचा विचार )
 

Topics mentioned in this article