Jemimah Rodrigues News : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात (India vs Australia, Women's World Cup Semi Final 2025) भारतीय टीमची स्टार बॅटर जेमिमा रॉड्रिग्स हिने एक अभूतपूर्व आणि अविस्मरणीय खेळी करत भारताला अंतिम फेरीत (Final) पोहोचवले. 339 रन चा डोंगराएवढा स्कोअर चेस करताना, भारतीय फॅन्सना हा विजय अशक्य वाटत होता, पण एका टोकाकडून विकेट्स पडत असतानाही जेमिमा रॉड्रिग्स हिने मैदान सोडले नाही. या ऐतिहासिक विजयानंतर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, जे विश्वास आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक होते.
One step closer to history 🏆
— ICC (@ICC) October 30, 2025
India pull off a chase for the ages and storm into the #CWC25 Final 🤩#INDvAUS pic.twitter.com/rMgZUIyFC3
धैर्य आणि जिद्दीची अविश्वसनीय इनिंग
339 रन च्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय टीम संकटात होती. मात्र, जेमिमाला हा विजय शक्य वाटत होता आणि तिने तो करून दाखवला. तिने शतक पूर्ण केले, पण आनंद व्यक्त केला नाही, कारण तिला भारताच्या विजयाचे महत्त्व माहीत होते. या शतकापेक्षा देशाला अंतिम फेरीत घेऊन जाणे अधिक महत्त्वाचे होते. तिने कमालीचे धैर्य आणि जिद्द दाखवत अखेरपर्यंत क्रीझवर तग धरला. 127 रन ची नाबाद, मॅच-विनिंग इनिंग खेळून तिने भारताला फायनलचे तिकीट मिळवून दिले.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करत टीम इंडियाला फायनलमध्ये नेणारी जेमिमा रॉड्रिग्स कोण आहे? )
'स्थिर राहा, देव तुमच्यासाठी लढेल'
सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा जेमिमावर जात होता, तेव्हा ती काहीतरी पुटपुटताना ऐकू येत होती. ती देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होती. मॅच संपल्यावर आणि स्टेडियम 'भारत' व 'जेमिमा' च्या नावांनी दुमदुमल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सामन्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' चा किताब स्वीकारताना जेमिमाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने सांगितले की, 'मी येशूचे आभार मानते, कारण मी हे माझ्या एकटीच्या बळावर करू शकले नसते. माझ्या आई-वडिलांचे, कोचचे आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे मी आभार मानते.'
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: ऐतिहासिक सेंच्युरीनंतर धाय मोकलून का रडू लागली जेमिमा? विजयानंतर केलं मोठं वक्तव्य, VIDEO )
सेंच्युरीपेक्षा देशाचा विजय महत्त्वाचा
जेमिमा पुढे म्हणाली की, 'माझे एकच लक्ष्य होते - भारताला हा सामना जिंकवून देणे, कारण आम्ही अनेकदा अशा परिस्थितीत हरलो आहोत.' तिने स्पष्ट केले की, 'आजचा दिवस माझ्या 50 रन किंवा 100 रन बद्दल नव्हता. आजचा दिवस भारताला जिंकवून देण्याबद्दल होता.' तिने कबूल केले की, काही संधींवर नशिबाने साथ दिली, पण देव योग्य वेळी सर्वकाही देतो, असा तिचा विश्वास आहे.
बायबलच्या वचनाने मिळाली नवी ऊर्जा
जेमिमाने या ऐतिहासिक खेळीबद्दल बोलताना सांगितले की, 'सुरुवातीला मी फक्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतःशी बोलत होते. पण शेवटी, माझी ऊर्जा पूर्णपणे संपली होती, मी खूप थकून गेले होते. तेव्हा मी बायबलमधील एक ओळ पुन्हा-पुन्हा उच्चारत होते. ती ओळ होती: 'बस स्थिर रहो, भगवान तुम्हारे लिए लड़ेंगे (Just be still, the Lord will fight for you).' मी फक्त उभी राहिले आणि देवाने माझ्यासाठी लढाई केली.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world