
अदाणी इंटरनॅशनल स्कुलमध्ये इंटरनॅशनल स्कूल्स स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ISSO) स्विमिंग रिजनल चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं.
अदाणी इंटरनॅशनल स्कुल ISSO च्य़ा प्रादेशिक कार्यक्रमाचं आयोजन करणारी पहिली संस्था बनली आहे. या स्पर्धेत 19 वर्षांच्या खालील आणि 11 वर्षांच्या खालील एकूण 115 तरुण जलतरणपटू सहभागी झाले होते. सात आंतरराष्ट्रीय शाळांमधील खेळाडू वेगवेगळ्या गटात या स्पर्धेत सहभागी झाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विद्यार्थ्यांमध्ये संघभावना आणि खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी वेगगळ्या स्पर्धांचे आयोजन ISSO कडून केले जाते. यासाठी देशव्यापी कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाच्या विकासामध्ये ISSO ची भूमिका महत्त्वाची आहे.

अदाणी इंटरनॅशनल स्कुलनं या स्पर्धेचं गुजरातमध्ये पहिल्यांदाच यजमानपद भूषविले नाही तर सर्वसाधारण विजेतेपद देखील पटकावले. त्यांनी वैयक्तिक गटात 19 गोल्ड, रिलेमध्ये 36 गोल्डसह एकूण 106 मेडल्सची कमाई केली. यामध्ये वैयक्तिक गटातील 22 सिल्व्हर, रिलेमधील 8 सिल्व्हर आणि वैयक्तिक गटातील 21 ब्रॉन्झ मेडल्सचाही समावेश आहे. अदाणी इंटरनॅशनल स्कुलनं एकूण 284 पॉईंट्सची या स्पर्धेत कमाई केली.
( नक्की वाचा : Adani Group : अदाणी-PGTI भागीदारीत अहमदाबादमध्ये गोल्फ प्रशिक्षण अकादमी, एप्रिलमध्ये पहिला टुर्नामेंट )
कपिल देव यांचं प्रशस्तीपत्रक
महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी उद्घाटनानंतर बोलताना सांगितलं की, 'अदाणी इंटरनॅशनल स्कुलमध्ये ISSO जलतरण प्रादेशिक चॅम्पियन्शिपचं उद्घाटन करताना मला खूप आनंद झाला. येथील क्रीडा सुविधा या असमान्य आहेत, असं प्रशस्तीपत्रकही त्यांनी यावेळी दिलं.
या सारख्या स्पर्धेच्या माध्यमातून अदाणी इंटनॅशनल स्कुल शहरामध्ये क्रीडा संस्कृती विकसित होण्यासाठी प्रयत्न करत आहे, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. मी याबाबत अदाणी परिवाराचे अभिनंदन करतो. तसंच भारतीय क्रीडा क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी शुभेच्छा देतो,' अशी भावना कपिल देव यांनी व्यक्त केली.
अदाणी इंटरनॅशनल स्कुलचे प्रमुख सर्जिओ पावेल यांनी सांगितलं की, ' कपिल देव यांचं आमच्या कॅम्पसमध्ये स्वागत करणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. त्यांना आमच्या क्रीडा सुविधा पाहताना आणि आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाहणे हा आमच्यासाठी खास क्षण होता. त्यांचे साधेपण तसंच त्यांनी साधलेल्या संवादाचा आमच्यावर, विद्यार्थ्यांवर तसंच त्यांच्या पालकांवर कायमचा प्रभाव पडला आहे. आम्ही त्यासाठी त्यांचे आभार मानतो. तसंच त्यांनी अदाणी इंटरनॅशनल स्कुलमध्ये चांगला वेळ घालवला असेल अशी आशा करतो.
गुजरातमध्ये पहिला ISSO प्रादेशिक कार्यक्रम आयोजित करणे हा अदाणी समुहाच्या क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या आमच्या ध्येयधोरणांचा भाग आहे. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम क्रीडा अनुभव देण्याच्या आमच्या ध्येयाचा ही स्पर्धा भाग आहे. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world