
Adani Group : अदाणी समूह एका नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अदाणी आणि PGTI यांनी एकत्र येत अहमदाबादमध्ये गोल्फ प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे. भारतात पुरुषांच्या व्यावसायिक गोल्फची अधिकृत मान्यता देणारी संस्था प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) शी भागीदारी करीत ‘अदाणी इनव्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप 2025' लाँच (Adani Group and PGTI to launch Invitational Golf Championship ) करण्यात आली आहे. विजेत्यांना 1.5 कोटींपर्यंत बक्षीसाची रक्कम देणारा हा पहिला टुर्नामेंट ग्रेटर नोएडाच्या जेपी ग्रीन्स गोल्ड अँड स्पा रिसॉर्टमध्ये 1-4 एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. अदाणी समूहाच्या उपक्रमाचा उद्देश गोल्फचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्याला मुख्य प्रवाहातील खेळ म्हणून प्रस्थापित करणे, तसेच भारतातील जागतिक चॅम्पियन्सची पुढील पिढी तयार करणे हा आहे.
कपिल देव आणि पीजीटीआयशी जोडले गेल्याचा आनंद अदाणी एन्टरप्रायझेसचे संचालक प्रणव अदाणी यांनी व्यक्त केला. यातून भारतात गोल्फ खेळाच्या वाढीमध्ये योगदान दिलं जात असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आम्ही गोल्फ या खेळातील सुलभता वाढवणं, सहभाग वाढावा यासाठी प्रोत्साहन देणे, जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देणं आणि खेळाच्या संधी देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असंही प्रणव अदाणी यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - Hurun India Rich List 2025 : गौतम अदाणींच्या संपत्तीत घसघशीत वाढ, देशातील टॉप 10 श्रीमंतांची यादी समोर
पीजीटीआयचे अध्यक्ष कपिल देव यांनी अदाणी समूहाने आभार मानले. अदाणी गोल्फ चॅम्पियनशिप 2025 च्या निमित्ताने भारतातील गोल्फ क्षेत्राला पाठिंबा दिल्याबाबत धन्यवाद मानले.
विशेष म्हणजे प्री-टूर्नामेंट इव्हेंट 29 मार्च 2025 मध्ये अहमदाबादमधील बेल्वेडियर गोल्ड आणि कंट्री क्लब आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासह पीजीटीआयमधील पाच प्रमुख प्रशिक्षण गोल्फ क्लिनिकचं आयोजन करतील, यामध्ये अदाणी इंटरनॅशनल शाळेतील 50 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world