इंडियन प्रीमियर लीगचं (IPL) 2024 चं सीझनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खराब गेलं. मुंबई इंडियन्सने केलेल्या मोठ्या बदलांमुळे देखील मुंबई इंडियन्स संघ यावर्षी चर्चेत राहिला. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेणे मुंबई इंडियन्सच्या फ्रॅन्चायजीला चांगलंच महागात पडलं. यामुळे फॅन्सच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हार्दिक पांड्याकडे संघाचं कर्णधारपद सोपवल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली. पांड्याला मैदानात आणि मैदानाबाहेर चाहत्यांनी ट्रोल केलं. याचा परिणाम ड्रेसिंग रूममध्येही पाहायला मिळाला आणि संघाच्या कामगिरीवरही दिसून आला. मुंबईने 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकले आणि 10 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
(नक्की वाचा- जय शहांनंतर BCCI सचिव कोण होणार? काँग्रेस नेत्यासह महाराष्ट्र भाजपामधील दिग्गजचीही चर्चा)
आता पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मेगा लिलावासाठी मुंबई इंडियन्स फ्रॅन्चायजींनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक फ्रँचायझींनी रोहित शर्माला पुढील हंगामात कर्णधारपदासाठी ऑफर दिल्या आहेत. पण मुंबईच्या अडचणी आणखी वाढू शकतात. रिपोर्ट्सनुसार, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) नुकतेच टी-20 मध्ये भारताचा कर्णधार बनलेल्या सूर्यकुमार यादवला पुढील हंगामासाठी कर्णधारपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.
(नक्की वाचा- शिखर धवनचे 'जगात भारी' 5 रेकॉर्ड्स, तिसरा रेकॉर्ड वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य)
सूर्यकुमार यादव पुढील हंगामात कोलकाता संघात सामील होऊ शकतो. कोलकाता देखील सूर्यकुमारला कर्णधार बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कोलकाता सूर्यकुमारला संघात सामील करुन घेण्यासाठी मुंबईसोबत ट्रेड डील करण्यासही तयार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र केकेआरने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.