जाहिरात

शिखर धवनचे 'जगात भारी' 5 रेकॉर्ड्स, तिसरा रेकॉर्ड वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Shikhar Dhawan Retires from International and Domestic Cricket: टीम इंडियाचा दिग्गज ओपनर शिखर धवननं व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

शिखर धवनचे 'जगात  भारी' 5 रेकॉर्ड्स, तिसरा रेकॉर्ड वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य
मुंबई:

Shikhar Dhawan Retires from International and Domestic Cricket: टीम इंडियाचा दिग्गज ओपनर शिखर धवननं व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत हा निर्णय जाहीर केला. धवननं आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केलीाय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिखर धवननं 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये काही मोठे रेकॉर्ड केले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून तो सक्रीय होता. या स्पर्धेतही त्यानं काही संस्मरणीय खेळी केल्या आहेत. धवनच्या खेळाची भविष्यात चर्चा होईल तेंव्हा त्यानं केलेले 5 मोठे रेकॉर्ड्स नक्की सर्वांना आठवतील.

  • शिखर धवननं 14 मार्च 2013 रोजी मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यानं पहिल्याच इनिंगमध्ये 85 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. तेव्हापासून आत्तापर्यंत पदार्पणाच सर्वात जलद सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड धवनच्या नावावर आहे. धवननं मोहाली टेस्टमध्ये 174 बॉलमध्ये 187 रन काढले होते. 
  • तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण धवननं भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 आणि 3000 रन करणारा बॅटर आहे. धवननं एकूण 167 वन-डे सामने खेळले. त्यामधील 164 इनिंगमध्ये त्यानं 44.11 च्या सरासरीनं  6793 रन काढले. वन-डे क्रिकेटमध्ये धवनच्या नावावर 17 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरींची नोंद आहे.

              ( नक्की वाचा : भारतीय क्रिकेटच्या 'गब्बर'ची निवृत्तीची घोषणा )

  • शिखर धवननं त्याच्या कारकिर्दीमधील 100 व्या वन-डे मॅचमध्येही सेंच्युरी झळकावली होती. भारताकडून कोणत्याही बॅटरनं केलेला हा खास रेकॉर्ड आहे.
  • आयसीसी स्पर्धांमध्येही धवननं नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. सलग दोन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोल्डन बॅट जिंकणारा धवन एकमेव क्रिकेटपटू आहे. 
  • आयपीएलमध्येही धवनची बॅट नेहमीच तळपली. जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या T20 लीगमध्ये धवननं 222 सामने खेळले. आयपीएलमध्ये सर्वाधिक फोर लगावण्याचा रेकॉर्डही धवनच्या नावावर आहे. त्यानं 221 सामन्यात  768 फोर लगावले आहेत. इतकंच नाही तर आयपीएलमध्ये सलग 2 सेंच्युरी झळकावणारा धवन हा पहिला खेळाडू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
भारतीय क्रिकेटच्या 'गब्बर'ची निवृत्तीची घोषणा
शिखर धवनचे 'जगात  भारी' 5 रेकॉर्ड्स, तिसरा रेकॉर्ड वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य
who-will-replace-jay-shah-as-bcci-secretary-if-he-becomes-icc-chairman
Next Article
जय शहांनंतर BCCI सचिव कोण होणार? काँग्रेस नेत्यासह महाराष्ट्र भाजपामधील दिग्गजचीही चर्चा