Mahesh Bhupathi on RCB: आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचा आणखी एक पराभव झाला आहे. आरसीबीनं सातपैकी सहा सामने गमावले असून त्यांची 'प्ले ऑफ' ची वाट खडतर झालीय. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ ड्यू प्लेसिस हे दिग्गज खेळाडू असूनही आरसीबीच्या कामगिरीत फरक पडलेला नाही. आरसीबीची निराशाजनक कामगिरी पाहून फक्त क्रिकेट फॅन्सच नाही तर माजी खेळाडू देखील वैतागले आहेत. दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीनं (Mahesh Bhupathi) एक पोस्ट शेअर करुन आरसीबीला विकण्याचा सल्ला दिलाय.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर महेश भूपतीनं पोस्ट शेअर करत बीसीसीआयला खास आवाहन केलंय. भूपतीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून त्यावर फॅन्स प्रतिक्रिया देत आहे. 'खेळ, आयपीएल, फॅन्स आणि खेळाडूंच्या भल्यासाठी बीसीसीआयनं आरसबीसाठी नव्या मालकाचा शोध घ्यावा. जो अन्य टीमप्रमाणे या फ्रँचायझीला मोठं करण्यासाठी काम करेल,' अशी संतापजनक प्रतिक्रिया भूपतीनं व्यक्त केली आहे.
सनरायझर्स हैदराबादनं सोमवारी झालेल्या सामन्यात आरसीबीचा 25 रननं पराभव केला. सनरायझर्सकडून ट्रॅव्हिस हेडनं शतक झळकावलं, तर हेनरिच क्लासेननं 67 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीच्या मदतीनं सनरायझर्सनं या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च स्कोअरची नोंद केली. त्यांनी 3 विकेटच्या मोबदल्यात 287 रन केले. सनरायझर्सनं याच सिझनमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 आऊट 277 रनचा रेकॉर्ड केला होता. स्वत:चाच रेकॉर्ड त्यांनी आरसीबीविरुद्ध मोडला.
विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही?
आरसीबीला 288 रनच्या टार्गेटला उत्तर देताना 7 आऊट 262 रन करता आले. पॅट कमिन्सनं 43 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर दिनेश कार्तिकनं 35 बॉलमध्ये 83 रन करत एकाकी प्रतिकार केला. या आयपीएल मॅचमधील 40 ओव्हर्समध्ये 549 रन झाले. हा एक रेकॉर्ड आहे.