Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदकविजेते नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि मनू भाकरच्या (Manu Bhaker) आई सुमेधा भाकर यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
सुमेधा या व्हिडिओमध्ये चांगल्याच भावुक झालेल्या दिसत आहेत. त्याचवेळी त्यांनी नीरजचा हात डोक्यावर ठेवून एक वचन मागितलं. त्यामुळे तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भारताच्या दोन अव्वल क्रीडापटूंचं लग्न होणार. त्यांचं नातं पक्क झालं आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत.
ट्रेंडिंग बातमी - मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral
काय झाली चर्चा ?
'भास्कर' नं दिलेल्या वृत्तानुसार सुमेधा यांनी नीरजला सिल्व्हर मेडल मिळालं म्हणून निराश होऊ नकोस. यापेक्षा जास्त कष्ट करं, असा सल्ला दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजमधील सोमवारचा हा व्हिडिओ आहे. 'माझ्या मुलीसारखं खेळणं सोडू नकोस. तुझ्यात आणखी बराच खेळ शिल्लक आहे.' असं सुमेधा यांनी सांगितलं. त्याचबरोबर तुला अजून कष्ट करायचे आहेत आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीमला हरवायचं आहे,' असंही सुमेधा यांनी नीरजला सांगितलं. मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी ही माहिती दिलीय.
मनू भाकर - नीरज चोप्रा यांचं लग्न होणार?
पॅरिसमधील या व्हायरल व्हिडिओनंतर मनू आणि नीरज चोप्रा यांचं लग्न होणार अशी चर्चाही सुरु झाली होती. नीरजच्या काकांनी ही चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलंय. नीरज चोप्रानं मेडल जिंकल्याचं संपूर्ण देशाला समजलं होतं. त्याचप्रमाणे त्याचं लग्न होईल त्याची माहितीही संपूर्ण देशाला मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
मनूच्या वडिलांनीही यावर स्पष्टीकरण दिलंय. मनू अजून खूप लहान आहे. सध्या तिचं लग्नाचं वय नाही. आम्ही या विषयावर कोणताही विचार केलेला नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर मनूच्या आईसाठी नीरज मुलासारखा असल्याचं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल, कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं )
मनू- नीरजची कमाल
मनू भाकर आणि नीरज चोप्रा या दोघांनीही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला आनंदाचे क्षण दिले. मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एकेरी एअर पिस्टल स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकलं. त्यानंतर याच प्रकारातील मिश्र गटात सरबजोत सिंहसोबत आणखी एका ब्रॉन्झची कमाई केली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल विजेते नीरज चोप्रानं पॅरिसमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं. त्यानं 89.45 मीटर लांब भाला फेकत दुसरा क्रमांक पटकावला. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणारा नीरज चोप्रा हा तिसरा भारतीय आहे.