IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या 47 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) पराभव केला. लखनऊने दिलेले विशाल लक्ष्य मुंबईच्या फलंदाजांनी यशस्वीरीत्या गाठले. मात्र, या विजयापेक्षाही मुंबईचा लेग स्पिनर रघु शर्मा याच्या एका भावनिक कृतीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माचे दिमाखदार पुनरागमन आणि रायन रिकल्टनची फटकेबाजी पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्या धमाकेदार कामगिरीला मागे टाकत मुंबईचा नवा गोलंदाज रघु शर्मा याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपली पहिली आयपीएल विकेट घेतल्यावर रघुने दाखवलेल्या एका संदेशाने सगळ्यांनाच भावुक केले.
काय होता तो 'व्हायरल' संदेश?
आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसरा सामना खेळणाऱ्या रघु शर्माने लखनौच्या अक्षत रघुवंशीला बाद केले. त्यानंतर त्याने उत्साहात ओरडण्याऐवजी खिशातून एक चिठ्ठी काढली आणि कॅमेऱ्यासमोर धरली. त्यावर लिहिले होते की,
“राधे राधे. तब्बल 15 वर्षांचा अत्यंत वेदनादायक प्रवास देवाच्या कृपेने आज संपला. मुंबई इंडियन्सने (ब्लू आणि गोल्ड) मला ही संधी दिली, त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन. जय श्री राम.”
(नक्की वाचा- CSK, IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज, एम एस धोनीबाबत आली सर्वात मोठी अपडेट रघूने दाखवलेली ही चिठ्ठी म्हणजे त्याच्या 15 वर्षांच्या अथक परिश्रमाचे फळ होते. 33 वर्ष वय असलेल्या या खेळाडूने घरगुती क्रिकेटमध्ये अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून त्याला आयपीएलमध्ये ओळख मिळाली. या क्षणी कर्णधार सूर्यकुमार यादवही त्याच्या जवळ जाऊन तो संदेश वाचण्याचा प्रयत्न करताना दिसला. रघुची ही कृती पाहून अनेकांना दिनेश रामदीन आणि अभिषेक शर्माच्या जुन्या सेलिब्रेशनची आठवण झाली. (नक्की वाचा- DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल) दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर परतलेल्या रोहित शर्माने आपल्या जुन्या शैलीत फलंदाजी केली. त्याला रायन रिकल्टनने मोलाची साथ दिली. लखनौकडून निकोलस पूरनने अर्धशतक झळकावून झुंज दिली, परंतु मुंबईच्या गोलंदाजीसमोर लखनौने सपशेल लोटांगण घातलं. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत आपली स्थिती सुधारली असून प्ले-ऑफच्या शर्यतीत आपले स्थान तांत्रिकदृष्ट्या कायम राखले आहे. 15 वर्षांची प्रतीक्षा आणि संघर्ष
रोहित शर्माची शानदार फटकेबाजी
मुंबईच्या प्ले-ऑफच्या आशा जिवंत