MS Dhoni Mystery: आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा चॅम्पियन ठरलेली चेन्नई सुपर किंग्जची टीम यंदाच्या हंगामात मात्र अपेक्षित कामगिरी करू शकली नाही. प्ले ऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी सीएसकेला संघर्ष करावा लागत आहे. मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगणार आहे.अशातच एम एस धोनीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पायाच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे धोनीनं ब्रेक घेतला होता. परंतु,दुखापत पूर्णपणे बरी न झाल्याने धोनीनं विश्रांती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
पुनरागमनासाठी अधिक वेळ लागेल
रिपोर्ट्सनुसार, धोनीच्या मांसपेशीमध्ये क्रॅम्प आणि गुडघ्याच्या जुन्या समस्येनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यामुळे धोनीला विश्रांती देण्यात आली आहे.सीएसकेचं मेडिकल स्टाफ धोनीच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. परंतु, दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी धोनी फीट झालेला नाही.
नक्की वाचा >> Baramati News: सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय, पण 'त्या' बॅनरने अनेकांची झोप उडवली, "अजितदादा पवार.."
धोनीने दिल्लीचा प्रवास सोडला
सूत्रांच्या माहितीनुसार, धोनी चेन्नईतच थांबून रिहॅबिलिटेशनर लक्ष केंद्रीत करत आहे.संघाचे अन्य खेळाडू दिल्लीला पोहोचले आहेत. पण धोनी संघात उपलब्ध नसल्याने टीमचं मनोबल आणि रणनीतीवर परिणाम होत आहे. टूर्नामेंटच्या या मोडवर धोनीचं नसणं डिफेंडिंग चॅम्पियन्ससाठी मोठा धक्का आहे.
गायकवाडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
धोनी मैदानात उतरत नसल्याने कर्णाधार ऋतुराज गायकवाडवर दबाव आणखी वाढला आहे. धोनी विकेट किंपिंग करतानाच संघाला मार्गदर्शनही करतो.पण आता गायकवाडला दिल्लीच्या स्लो विकेटचा सामना करावा लागणार आहे. धोनी लवकरच फिट होऊन होमग्राऊंडवर होणाऱ्या पुढच्या सामन्यासाठी सज्ज असेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
नक्की वाचा >> Buldhana News: खामगाव शहरात खळबळ! पत्नीने घटस्फोटाची मागणी केली, नंतर घडली सर्वात भयंकर घटना, 4 जणांनी..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world