बाबर आझमची हकालपट्टी निश्चित! 3 खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी चुरस

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बाबर आझमची हकालपट्टी केली तर कॅप्टनपदासाठी त्यांच्यापुढं 3 पर्याय आहेत.   

Advertisement
Read Time: 2 mins
T20 WC Babar Azam टी 20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलंय.
मुंबई:

Who Replaced Babar Azam as Captain in Pakistan Cricket Team:  टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानची टीम साखळी फेरीत बाद झाली आहे. आणखी एक लाजीरवाणी बाब म्हणजे शेवटचा सामना बाकी असूनही पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलंय. बाबर आझमच्या टीमसाठी आयर्लंड विरुद्धचा सामना केवळ औपचारिकता आहे. या खराब कामगिरीनंतर बाबर आझमची कर्णधारपदावरुन हकालपट्टी निश्चित मानली जातीय. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू, मीडिया तसंच फॅन्सनी त्याच्या या स्पर्धेतील कॅप्टनसीवर जोरदार टीका केलीय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बाबरची हकालपट्टी केली तर कॅप्टनपदासाठी त्यांच्यापुढं 3 पर्याय आहेत.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मोहम्मद रिझवान

मोहम्मद रिझवान हा बाबर आझमचा बऱ्याच काळापासून ओपनिंग पार्टनर आहे. रिझवानकडं पाकिस्तान सुपर लीगमध्ये कर्णधार म्हणून अनुभव आहे. टीममधील खेळाडूंमध्येही तो लोकप्रिय आहे. बाबरसारखी बॅटींगची शैली असलेल्या रिझवानचं नाव त्याचा उत्तराधिकारी म्हणून सर्वात आघाडीवर आहे. 

शाहीन आफ्रिदी

पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहीद आफ्रिदीचा शाहीन जावाई आहे. पाकिस्तानचा हा फास्ट बॉलर सर्व फॉर्मेटमधील टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. लाहोर कलंदर्सनं शाहीनच्या कॅप्टनसीमध्ये दोन वेळा पीएसएलचं विजेचेपद पटकावलंय.  अर्थात वन-डे वर्ल्ड कपनंतर शाहीन काही काळ पाकिस्तान टीमचा कॅप्टन होता. त्याच्या कार्यकाळात पाकिस्तानची कामगिरी सुपर फ्लॉप झाली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यला आणखी एक संधी देऊ शकते. 

ट्रेंडींग बातमी - T20 WC शेवटच्या बॉलवर जिंकता-जिंकता हरलं नेपाळ, लहान मुलासारखा रडू लागला खेळाडू
 

शादाब खान

शादाब खान हा पाकिस्तान क्रिकेट टीममधील प्रमुख ऑल राऊंडर आहे. त्यानंही यापूर्वी टीमचं नेतृत्त्व केलंय. शादाब बऱ्याच काळापासून टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. त्यामुळे बाबरनंतर त्याची कॅप्टन म्हणून निवड झाली तर ते फारसं आश्चर्यकारक नसेल. 

Advertisement

ट्रेंडींग बातमी - T20 WC  भारत - पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम होणार उद्धवस्त!