जाहिरात
Story ProgressBack

T20 WC : भारत - पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम होणार उद्धवस्त! बुलडोझर दाखल

T20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम आता उद्धवस्त करण्यात येणार आहे.

Read Time: 2 mins
T20 WC : भारत - पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम होणार उद्धवस्त! बुलडोझर दाखल
न्यूयॉर्क:

T20 World Cup Nassau County Stadium : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत यंदा T20 वर्ल्ड कप होतोय. या वर्ल्ड कपच्या निमित्तानं अमेरिकेची आयसीसीच्या मुख्य स्पर्धेत दमदार एन्ट्री झालीय. न्यूयॉर्कमधील नसाउ स्टेडियममध्ये यंदा या वर्ल्ड कपमधील 8 सामने खेळवण्यात आले. बुधवारी (12 जून) रोजी शेवटचा सामनी झाला. त्यामध्ये भारतानं अमेरिकेचा पराभव केला. आता हे स्टेडियम उद्धवस्त करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरु झालीय. या वर्ल्ड कपसाठी हे तात्पुरतं स्टेडियम बनवण्यात आलं होतं. या स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपरहिट सामना झाला. त्यामध्ये भारतानं दमदार विजय मिळवला. 

ANI नं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये या मैदानाजवळ बुलडोझर दिसत आहेत. या स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता 34000 होती. भारताचे तीन सामने या स्टेडियमवर झाले. हे तीन्ही सामने टीम इंडियानं जिंकले. 

( नक्की वाचा : T20 WC : मॅचपूर्वी 'या' वेळेला जमा केले जातात खेळाडूंचे मोबाईल, वाचा काय आहे नियम? )
 

248 कोटींचा खर्च

याबाबतच्या वृत्तानुसार हे स्टेडियम उभारण्यासाठी सुमारे 248 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. हे स्टेडियम उभारण्यासाठी जवळपास 106 दिवस लागले. स्पटेंबर 2023 मध्ये हे स्टेडियम उभारण्याची सुरुवात झाली होती. आता 6 आठवड्यांच्या आत हे स्टेडियम तोडण्यात येणार आहे. 

ड्रॉप इन पिचचा केला होता वापर

नासाउ क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ड्रॉप इन पिचचा वापर करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडमधून हे पिच मागवण्यात आले होते. या पिचवर बॅटिंग करणे आव्हानात्मक होते. या पिचवर सर्वााधिक 137 रन्स झाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
T20 WC : मॅचपूर्वी 'या' वेळेला जमा केले जातात खेळाडूंचे मोबाईल, वाचा काय आहे नियम?
T20 WC : भारत - पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम होणार उद्धवस्त! बुलडोझर दाखल
T20 World Cup 2024 Nepal star run out on last ball in tears after 1 run loss to south africa
Next Article
T20 WC शेवटच्या बॉलवर जिंकता-जिंकता हरलं नेपाळ, लहान मुलासारखा रडू लागला खेळाडू
;