गौतम गंभीरची मागणी पूर्ण, 'हा' दिग्गज झाला टीम इंडियाचा बॉलिंग कोच

Team India New Bowling Coach : टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) सूत्रं हाती घेतल्यानंतर बॉलिंग कोचचा शोध सुरु होता.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:

Team India New Bowling Coach : टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) सूत्रं हाती घेतल्यानंतर बॉलिंग कोचचा शोध सुरु होता. या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावं चर्चेत होती. आता हा शोध संपलाय. 'क्रिकबझ'नं दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर मॉर्ने मोर्केलची (Morne Morkel) भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून त्याचा कार्यकाळ सुरु होईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्वत: क्रिकबझला ही माहिती दिली आहे. टीम इंडियाची बांगलादेश विरुद्धची टेस्ट सीरिज 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मोर्केलची बॉलिंग कोच म्हणून ही पहिली सीरिज असेल. मोर्केलची या पदावर नियुक्ती करण्यासाठी गौतम गंभीर आग्रही होतं, असं वृत्त होतं. गंभीरची ही मागणी बीसीसीआयनं मान्य केली आहे. 

( नक्की वाचा : धक्कादायक! दिग्गज क्रिकेटपटूनं स्वत:च संपवलं आयुष्य, मृत्यूनंतर 7 दिवसांनी पत्नीचा गौप्यस्फोट )

कोण आहे मॉर्ने मोर्केल ?

गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्स (LSG) टीमचा मेंटॉर असताना मोर्केल या टीमचा बॉलिंग कोच होता. गंभीर आणि मोर्केल यांनी लखनौ टीमसोबत 2 वर्ष एकत्र काम केलं. त्याच काळात गंभीर आणि मोर्केल यांच्यात चांगला बॉन्ड तयार झाला असं मानलं जात आहे. मागच्या वर्षी झालेल्या वन-डे वर्ल्ड कपच्या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट टीमचा कोच म्हणूनही मॉर्केलनं काम केलं आहे.  वर्ल्ड कपनंतर करार PCB सोबतचा करार संपल्यानं त्यानं या जबाबदारीचा राजीनामा दिला होता. 

( नक्की वाचा : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला... )

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फास्ट बॉलर अशी मोर्केलची ओळख होती. त्यानं 86 टेस्टमध्ये 309 तर 117 वन-डेमध्ये 188 विकेट्स घेतल्या. मोर्केलनं 44 आंतरराष्ट्रीय T20 सामनेही खेळले. या सामन्यामध्ये त्यानं 47 विकेट्स घेतल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या आयपीएल टीमचाही मोर्केल सदस्य होता. 

Advertisement
Topics mentioned in this article