
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा महेंद्र सिंह धोनी अचानक मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग जर्सीमध्ये दिसल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. धोनी चेन्नईची साथ सोडून मुंबईकडून खेळणार का, अशा चर्चांनी जोर धरला आहे. आयपीएल ट्रान्सफरच्या वावड्या उठू लागल्या आहेत.
उद्योजक अर्जुन वैद्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये धोनी मुंबई इंडियन्सची प्रशिक्षण जर्सी परिधान करून एका फुटबॉल मैदानाच्या बाहेर एका ग्रुपसोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोला "Football game with MS" असे कॅप्शन देण्यात आले होते.
Dream come true. Atleast off the field, Thala Dhoni wears the Mumbai Indians shirt. pic.twitter.com/Lxsd0SmWdD
— Krishna Anand (@KrishnaAnand_) October 7, 2025
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सीएसकेचे चाहते गोंधळात सापडले आहेत. धोनीसारखा खेळाडू, जो सीएसकेचा आधारस्तंभ आहे, त्याने प्रतिस्पर्धी संघाची जर्सी का परिधान केली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही MI च्या चाहत्यांनी धोनीला त्यांच्या संघाच्या जर्सीमध्ये पाहून आनंद व्यक्त केला, तर अनेकांनी 'धोनी चेन्नईला रामराम ठोकून मुंबईकडे जाणार' अशी चर्चा सुरू केली. मात्र, धोनीने किंवा सीएसकेने अशा कोणत्याही निर्णयाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
Wow Dhoni in Mumbai Indians jersey. pic.twitter.com/3LmwZGJoSS
— R A T N I S H (@LoyalSachinFan) October 7, 2025
धोनीने आणखी एक टप्पा गाठला
क्रिकेटबाहेरील एका साध्या व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण आले असतानाच, धोनीने मोठी घोषणा केली. यंत्रसामग्रीबद्दल विशेष प्रेम असलेला धोनी आता अधिकृतपणे DGCA प्रमाणित ड्रोन पायलट बनला आहे. दुचाकींच्या आवडीबद्दल प्रसिद्ध असलेल्या धोनीने आता ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. त्याने गरुडा एरोस्पेसकडून ड्रोन पायलटचा परवाना मिळवला आहे. धोनीने क्रिकेट कारकिर्दीसोबतच 2011 मध्ये भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल हा मानद दर्जाही मिळवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world